‘तुला हवं होतं ते मी केलं, आता समाधानी राहा’, हे शब्द ७ वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले, व्हिडिओ पाहून पोलिसही थरारले
ममता शशिकांतची तिसरी पत्नी. त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते. ममता प्रेग्नेंड होती. ममतावरील प्रेमामुळे त्याने घरातील प्रत्येक भिंतीवर तिचे फोटो लावले होते. इतकंच काय बेडरूम, बाथरूममध्येही ममताचेच फोटो होते.
इंदूर : इंदूरमधील तेजाजी नगर भागात शशिकांत आणि ममता हे जोडपे रहात होते. ममता शशिकांतची तिसरी पत्नी. त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते. ममता प्रेग्नेंड होती. ममतावरील प्रेमामुळे त्याने घरातील प्रत्येक भिंतीवर तिचे फोटो लावले होते. इतकंच काय बेडरूम, बाथरूममध्येही ममताचेच फोटो होते. प्रतीक हा 7 वर्षीय शशिकांतच्या पहिल्या पत्नीचा मुलगा. अशातच मदर्स डे आला. शशिकांतने ममतासोबत प्रतीकचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला. मदर्स डे झाल्यानंतर प्रसूतीसाठी ममता राडगढला माहेरी गेली. पण, जाताना ती शशिकांत सोबत भांडून गेली. त्यांच्यातील भांडणाचे कारण अगदीच शुल्लक होते. पण, त्याचा आगडोंब उसळला. ममता भडकली होती.
मदर्स डे च्या दिवशी शशिकांतने व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवलेले फोटो हेच त्यांच्या भांडणाचे कारण होते. पहिल्या पतीपासून झालेला सावत्र मुलगा प्रतीक याचा ममता मनातून प्रचंड राग करत असे. प्रतिकवरून त्यांच्यात भांडण होत असे. शशिकांतने व्हाटसअँपला फिती ठेवले ही बाब ममताला खटकली होती. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि ती माहेरी निघून गेली.
मी तुमच्यासोबत राहणार नाही
ममता माहेरी गेल्यावर शशिकांत तिला फोन करून परत येण्यासाठी सांगत होता. पण, ममताने त्याला स्पष्ट सांगितले काय करायचे आहे ते ठरवा. एक तर घरात प्रतिक राहील किंवा ममता राहील. त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते करा. प्रतीक घरातून गेल्याशिवाय घरी येणार नाही असे तिने निक्षून सांगितले.
अखेर त्याने निर्णय घेतला
ममतासोबत भांडण झाल्यानंतर शशिकांत हा प्रतीकसोबत मुलासोबत वेळ घालवू लागला. त्याला ममतेची आठवण येत होती. अशाच एकदा मुलासवबत खेळत असताना शशिकांतने कठोर निर्णय घेतला.
त्याने मुलाला खोलीत नेले. काही वेळ त्याच्याशी खेळला. त्यानंतर टीव्हीचा आवाज वाढवून त्याने प्रतीकचा गळा दाबला. प्रतीकला त्रास होत होता. ते पाहून शशिकांत म्हणाला, मला तुला मारायचे नव्हते पण माझी मजबुरी आहे.
तुला जे हवं होतं ते मी केलं
प्रतीकची हत्या केल्यानंतर शशिकांत दोन तास त्याच्याजवळ बसून होता. त्याने एक व्हिडीओ बनवून तो ममताला पाठवला. तो तिला सांगत होता, बघ, तुला जे हवं होतं ते मी केलं आहे. बघ, प्रतीकचा मृतदेह पलंगावर पडला आहे आता समाधानी राहा. त्यानंतर त्याने मुलाचा मृतदेह एका निर्जन स्थळी टाकला.
इंदूर पोलिसांना कुणा मुलाचा मृतदेह तेजाज नगर परिसरात कुणी अज्ञाताने टाकून दिल्याची माहिती मिळाली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला. सदर मुलगा तेजाजी नगरमधील शशिकांत याचा असल्याचे कळले. त्यांनी शशिकांतची चौकशी सुरु केली. त्या चौकशीतून या हत्येच्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्यातील व्हिडिओच्या आधारे आरोपी वडील शशिकांत आणि सावत्र आई ममता यांना अटक केली आहे.