‘दृश्यम’ पाहून आखला चोरीचा फूलप्रूफ प्लान, वेशही बदलला, पण चपलेने केली पोलखोल…

चित्रपट पाहून त्याने चोरीचा प्लान आखला, आणि तो यशस्वीही ठरला. मात्र त्याच्या चपलेमुळे त्याच्या गुन्ह्याची पोलखोल झाली आणि तो पोलिसांच्या ताब्यात सापडला.

'दृश्यम' पाहून आखला चोरीचा फूलप्रूफ प्लान, वेशही बदलला, पण चपलेने केली पोलखोल...
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 4:59 PM

लखनऊ : एखादा चोर असो वा गुन्हेगार, कितीही सफाईने त्यांनी चोरी (theft) केली तरीही एखादी अशी छोटीशी चूक करतातच आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतात. कानून के हाथ लंबे होते है, असं म्हणतात ते काही उगीच नाही. कितीही फूलफ्रूफ प्लान आखून गुन्हा (crime) केला तरी पकडले जाण्यासाठी छोटीशी चूकहू पुरेशी होते. असाच एक प्रकार लखनऊ मध्ये घडला आहे. तिथे एका हुश्शार चोराने चोरीचा प्लान आखला, तो यशस्वीही झाला पण… त्याच्या चपलेने त्याची पोलखोल केली आणि पोलिसांच्या हातात सापडला.

वीर शंकर असे त्या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या शॉपिंग सेंटरमधील रकमेवर डल्ला मारला. मात्र त्यासाठी त्याने जे जे काही (प्लानिंग) केले ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. लखनऊमध्येच राहणाऱ्या या इसमाने ‘दृश्यम’ चित्रपट पाहून त्याच्यापासून प्रेरणा घेतली आणि तो काम करत असलेल्या शॉपिंग सेंटरमध्येच चोरी केली. हे प्रकरण आलमबाग येथील मेगा मार्टमधील आहे.

वीर शंकर हा इसम तेथे गेल्या वर्षापासून असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने जे कृत्य केलं आणि त्यासाठी जे प्लानिंग केलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीर शकंर हा ऐशबादमधील श्रम विहार कॉलनीतील रहिवासी असून तो विशाल मेगा मार्टच्या आलमबाग येथील रामनगर सेंटरमध्ये कार्यरत होता. त्याने पोलिसांच्या चौकशीत जे काही कबूल केलं ते अतिशय थक्क करणारं आहे.

महिलेच्या पोशाखात केली चोरी

वीर शंकरने त्याच्या शॉपिंग सेंटरमध्ये चोरी करण्याचा प्लान खूप आधीपासून आखला होता. सर्वप्रथम त्याने 29 जून लॉकरची चावी पळवली, त्यानंतरही तो दुकानात येतच होता. चावी चोरीला गेल्याची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही हे समजल्यानंतर त्याची हिंमत वाढली आणि त्याने चोरीचा प्लान पुढे नेण्याचे ठरवले.

नंतर त्याने 9 जुलै रोजी मोठी चोरी करण्याची योजना आखली. आपल्या बहिणीची तब्येत बरी नसल्याचा बहाणा देत तो शॉपमधून बाहेर पडला. त्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन त्याने कपडे बदलून महिलेचा पोशाख घातला. ओळख लपवण्यासाठी त्याने चश्मा लावला तसेच तोंडावरही स्कार्फ लावला होता. पकडले जाऊ नये म्हणून त्याने सीसीटीव्हीची दिशा देखील बदलली होती, असे त्याने पोलिस चौकशीत ककबूल केले. नंतर अतिशय हुशारीने तो कॅश ठेवलेल्या रूममध्ये गेला आणि २० लाख रुपयांची रक्कम चोरी केली.

बहिणींच्या लग्नासाठी केले चोरीचे कृत्य

पोलीस कोठडीत कठोरपणे चौकशी केल्यानंतर वीर शंकरने चोरीची कबुली दिली असून दोन बहिणींच्या लग्नासाठी ही चोरी केल्याचे सांगितले. मात्र पोलिस त्याचा युक्तिवाद मानायला तयार नाहीत. कारण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तो एका सधन कुटुंबातील आहे.

पोलिसांच्या चौकशीत तो पहिल्यांदा बरीच टाळाटाळ करत होता. शॉपिंग सेंटरच्या मॅनेजरलाही यात फसवण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र त्याच्या चपलेने त्याचा घात केला. चपलेमुळे सर्व पितळ उघडं पडलं. कारण चोरी करण्यासाठी जाताना त्याने महिलेचा वेष तर घातला, रूप बदलून सर्व खबरदारीही घेतली पण गडबडीत तो चप्पल बदलायला विसरला. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये दिसणार्‍या एका व्यक्तीची चप्पल आणि वीर शंकरची चप्पल सारखीच असल्याचे आढळल्यावर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय अधिकच बळावला.

गुन्ह्यापूर्वी पाहिला होता ‘दृश्यम’

हा गुन्हा करण्यापूर्वी आरोपी वीर शंकरने अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाचे दोनही भाग पाहिले होते. दृश्यम चित्रपट तीन वेळा पाहून चोरीचा प्लान आखला होता, असे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.