हुंड्यात हवी होती त्याला ‘लक्झरी’ कार, नाही दिली म्हणून बायकोला सोडून झाला फरार

नवरीच्या वडिलांनी आपल्या डॉक्टर मुलीचा बायोडेटा मॅट्रिमोनिअल साइटवर टाकला. तो पाहून त्यांना हिसार येथील डॉ. अबीर गुप्ता यांचा फोन आला. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर डॉ. अबीर यांच्या आई वडिलांनी नवरी मुलीच्या वडिलांसोबत पुढील बोलणी केली.

हुंड्यात हवी होती त्याला 'लक्झरी' कार, नाही दिली म्हणून बायकोला सोडून झाला फरार
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 3:09 PM

गोवा : नवरीच्या वडिलांनी मोठं स्थळ मिळतंय म्हणून मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न लावून दिलं. २५ लाखांचा हुंडा दिला, दागदागिने दिले. पण, केवळ हुंड्यात देतो म्हणूने सांगितलेली ‘लक्झरी’ कार मिळाली नाही म्हणून नवऱ्याने बायकोला सोडून फरार झाल्याची घटना गोव्यात घडलीय. नवरी मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. तर, नवरी मुलीनेही विवाहापूर्वी त्याने आपल्याला वारंवार नेपाळला बोलावले आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. मॅट्रिमोनिअल साइटवरून या दोघांचे प्रोफाइल पाहून या दोघा दापंत्याच्या आईवडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले होते.

नवरीच्या वडिलांनी आपल्या डॉक्टर मुलीचा बायोडेटा मॅट्रिमोनिअल साइटवर टाकला. तो पाहून त्यांना हिसार येथील डॉ. अबीर गुप्ता यांचा फोन आला. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर डॉ. अबीर यांच्या आई वडिलांनी नवरी मुलीच्या वडिलांसोबत पुढील बोलणी केली. डॉ. अबीर गुप्ता हा सध्या नेपाळ विद्यापीठातून ईएनटी स्पेशॅलिटी करत असून त्याचे वडील अरविंद गुप्ता आणि आई आभा गुप्ता हे दोघेही डॉक्टर आहेत. तसेच हिसार येथे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे.

हे सुद्धा वाचा

गुप्ता कुटुंबीय आणि नवरी मुलीचे वडील यांच्यातील बोलणी पुढे सरकू लागली. 26 जानेवारी 2023 ही लग्न तारीख निश्चित झाली. मात्र, त्याआधी गुप्ता यांनी नवरी मुलीच्या वडिलांकडे 25 लाख इतका हुंडा मागितला. मुलीच्या वडिलांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली. त्यानंतर 26 तारखेला गोवा येथील अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला.

२५ लाख इतका हुंडा देऊनही लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या वडिलांनी केला. मात्र, इतक्यावरही गुप्ता यांचे समाधान झाले नाही. लग्नाचे फेरे झाल्यानंतर अबीर याच्या आई-वडिलांनी महागड्या अशा ‘बीएमडब्ल्यू’ कारची मागणी केली. ‘बीएमडब्ल्यू’ दिली तरच नवऱ्या मुलीला सोबत नेऊ नाही तर तिला घरीच ठेवा, अशी धमकीही त्यांनी दिली.

नवरा मुलगा आणि गुप्ता कुटुंबीय यांची समजूत काढत मुलीच्या वडिलांनी ‘बीएमडब्ल्यू’ देण्याचे मान्य केले. नवं दाम्पत्य नेपाळला जाण्यासाठी निघाले. गोवा विमानतळावर त्यांचे सिक्युरिटी चेकिंग झाले. काही वेळातच नवरी मुलीला थोड्या वेळाने येतो असे सांगून अबीर याने पळ काढला.

अबीरची आई डॉ. आभा गुप्ता यांनी नवरी मुलीकडून दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. तोपर्यंत अबीर याने आपला मोबाईल बंद केला होता. त्या नवरी मुलीला विमानतळावर एकटीच सोडून गुप्ता कुटुंबाने तेथून पळ काढला. नवरी मुलीने आपल्या वडिलांना फोन करून झाल्याप्रकाराची माहिती दिली. नवरी मुलगी आणि तिच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून एफआयआर दाखल केली. पोलीस फरार आरोप डॉ. अबीर आणि त्यांच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.