Boss : कर्मचाऱ्याने वैतागून दिला राजीनामा, बॉस इतका संतापला की फोडले डोकं, मग पुढे काय झाले..

Boss : भर बैठकीत बॉसने थेट कर्मचाऱ्याचे डोकेच फोडले

Boss : कर्मचाऱ्याने वैतागून दिला राजीनामा, बॉस इतका संतापला की फोडले डोकं, मग पुढे काय झाले..
बॉसने फोडले डोकेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 6:46 PM

मुंबई : प्रत्येक कार्यालयात (office), कचेरीत वाद होतच असतात. पण त्याचे पर्यवसन मारहाणीत होण्याचे प्रसंग फारच कमी ठिकाणी घडतात. पण मुंबईतील बोरवलीतील (Borivali) एक कंपनी मात्र त्याला अपवाद ठरली आहे. येथे बॉसने थेट कर्मचाऱ्याचे डोकेच फोडले. आता ही विमा कंपनी (Insurance Company) असल्याने कर्मचाऱ्याला विम्याचे संरक्षण मिळाले की नाही, हा प्रश्न तसा अनुत्तरीत आहे..

या विमा कंपनीतील कर्मचाऱ्याला दिलेले टार्गेट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्याने राजीनामा दिला. पण बॉसने हा राजीनामा नामंजूर केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत बॉसने या कर्मचाऱ्याच्या डोक्यात टेबलवरील घड्याळ घातले.

या अनपेक्षित हल्ल्याने कर्मचारी भाबांवला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. कर्मचाऱ्याने बॉसविरोधात शड्डू ठोकले. त्याने बॉसविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

प्रकरणात पोलिसांनी 35 वर्षाच्या मॅनेजर अमित सिंहविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पीडित आनंद सिंह याने मॅनेजर विरोधात तक्रार दिली. तसेच त्याची आपबित्ती सांगितली.

तक्रारदारानुसार, तो गेल्यावर्षीपासून सदर विमा कंपनीत नोकरीला आहे. त्याला एका बँकेच्या सहयोगाने आरोग्य विमा विक्रीचे टार्गेट मिळाले. तो सप्टेंबर महिन्यात 5 लाख रुपये टार्गेट पूर्ण करु शकला नाही.

त्यानाराजीने त्याने स्वतः बॉसकडे राजीनामा दिला. अमित सिंह याने तो राजीनामा स्वीकारला नाही. त्यानंतर त्याने शनिवारी तक्रारकर्त्याला कार्यालयात बोलाविले. त्याने टार्गेट का पूर्ण केले नाही यावरुन वाद झाला.

संध्याकाळी ऑफिसमध्ये बैठक सुरु असताना पुन्हा वाद झाला. टार्गेट पूर्ण न केल्याने आरोपीने तक्रारकर्त्याच्या डोक्यात प्लास्टिकचं घड्याळ फोडलं. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले की, त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्याला अटक करण्यात आली नाही. आरोपीला पोलिस कलम 41 नुसार नोटीस पाठवून पुढील कारवाई करणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.