दक्षिण आफ्रिकन महिलेकडून 9 कोटींचं हेरॉईन जप्त, मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई

एका दक्षिण आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे 3 किलो हेरॉईन हे अंमली पदार्थ सापडलं आहे.

दक्षिण आफ्रिकन महिलेकडून 9 कोटींचं हेरॉईन जप्त, मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई
Heroin Seized
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:20 PM

मुंबई : एनसीबीच्या मुंबई झोनने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे (Heroin Worth Rs. 9 Crore Seized By NCB). एका दक्षिण आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे 3 किलो हेरॉईन हे अंमली पदार्थ सापडलं आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत नऊ कोटी रुपये आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे (Heroin Worth Rs. 9 Crore Seized By NCB).

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना एका आंतरराष्ट्रीय तस्कर महिलेबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी आपल्या पथकाला सक्रिय केलं होतं. त्यानुसार, एनसीबीचं पथक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवून होतं. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आली.

ही महिला मुंबईहून जोहान्सबर्ग येथे जात होती. या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या सामानाची तपासणी केली असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या बागेत एक चोर कप्पा आढळून आला आणि तो चोर कप्पा उघडला असता त्यात दोन किलो हेरॉईन हे अंमली पदार्थ सापडलं. तर तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात एक किलो हेरॉईन सापडलं (Heroin Worth Rs. 9 Crore Seized By NCB).

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव खाणीयसिले प्रॉमिसे असं आहे. ती दक्षिण आफ्रिका देशाची नागरिक आहे. या महिलेला एनसीबी कार्यलयात आणून तिला अटक केली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Heroin Worth Rs. 9 Crore Seized By NCB

संबंधित बातम्या :

दागिणे एकाचे, सोडवले दुसऱ्यानंच, बुलडाण्यातील ICICI बँकेत 44 तोळे सोनं चोरीनं खळबळ

एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एकाला अटक, नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनतंय?

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.