Pune Crime : सामान्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का ? पुण्यात पुन्हा हिट अँड रन.. आलिशान कारने डिलीव्हरी बॉयला चिरडलं

मे महिन्यात पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत पोर्श कार चालवत बाईकवर बसलेल्या एक तरूण व तरूणीला अक्षरश: चिरडून मारलं होतं. तसाच काहीसा प्रकार पुण्यात पुन्हा घडला असून त्यामध्ये 21 वर्षांच्या तरूणाला जीव गमवावा लागला आहे.

Pune Crime : सामान्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का ? पुण्यात पुन्हा हिट अँड रन.. आलिशान कारने  डिलीव्हरी बॉयला चिरडलं
पुण्यात पुन्हा हिट अँड रन.
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 11:55 AM

पुण्यात मे महिन्यात कल्याणीनगरमध्ये झालेला भीषण अपघात अजूनही लोकांच्या आठवणीत आहे. बड्या बिल्डरच्या लाडावलेल्या अल्पवयीन मुलाने बारमध्ये दारू प्यायली, परवानगी नसतानाही पोर्श कार भरधाव वेगाने चालवली आणि बाईकवर बसलेल्या दोघांना उडले. त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा हकनाक बळी गेला. याप्रकरणाचे पदसाद अद्याप उमटत आहेत, खटला सुरू आहे, तोच पुण्यात आता तसाच आणखी एक भयानक प्रकार घडला आहे. यावेळेस फक्त जागा वेगळी आहे, पण घटनाक्रम तोच… सामान्य माणसांच्या जीवाला खरंच काही किंमत आहे का हा विचार करायला लावणारा..!

पुण्यातील प्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरामध्ये हिट अँड रनचा हा भयानक प्रकार घडला आहे. भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने एका बाईकस्वाराला धडक देत चिरडलं आणि त्या तरूणाला तसंच मृत्यूच्या दारात सोडून तो कारचालक तिथून तोंड लपवून पळून गेला. या अपघातामध्ये 21 वर्षांच्या एका डिलीव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

मध्यरात्री झाला भीषण अपघात

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास हा अपघात घडला.  रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात घडला तेव्हा कारचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला. अखेर अथक प्रयत्नांनी त्याला ताब्यात घेण्यात आलं. प्रदीप तयाल असे आरोपीचे नाव असून तो हडपसर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर तो फरार झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा काल 1 ते 1.30 च्या दरम्यान एबीसी रोडवरून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता. त्याची आलिशान कार भरधाव वेगाने धावत होती. प्रथन त्याच्या कारने एका ॲक्टिव्हाला धडक दिली, त्यामध्ये तिघे जण किरकोल जखमी झाले. मात्र तरीही कारचालक थांबला नाही, तो तसाच वेगाने पुढे गेला आणि बाईकवरू जाणऱ्या रौफ याला जोरदार धडक दिली. तो गंभीर जखमी होऊ खाली कोसळला. पण त्याला मदत करायची सोडून कारचालक त्याला तेथेच जखमी अवस्थेत सोडून पळू गेला.

आसपासच्या लोकांनी तातडीने जखमी बाईकस्वाराला रुग्णालायत दाखल केले. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झालाय याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.