गणेशोत्सवाला गालबोट, सणाच्या दिवशीच मुलुंडमध्ये हिट अँड रन; गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना चिरडलं

या अपघातात भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू कारने दोघांना चिरडलं. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून दुसऱ्या जखमी प्रकृती अतिशय गंभीर आहे.

गणेशोत्सवाला गालबोट, सणाच्या दिवशीच मुलुंडमध्ये हिट अँड रन; गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना चिरडलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 11:17 AM

मुंबईत गेल्या काही महिन्यांत हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या असून अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या सर्वत गणेशोत्सवाचे वातावरण आहे. मात्र एका धक्कादायक घटनेमुळे मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागलं आहे. मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका भरधाव वेगाने आलेल्या बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडलं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या जखमीची अवस्था अतिशय गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत हादरली आहे.दोघांना कारने चिरडल्यानंतर कारचालकाने तिथे थांबून त्यांना मदत करण्याची तसदी न घेताच तो तिथून तातडीने पसार झाला. वेळीच जखमींना मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, मात्र अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक तेथून लागलीच फरार झाला.

देशभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह आहे, मात्र मुलुंडमध्ये पहाटे घडलेल्या या अपघाता शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. फरार कारचालकाचा कसून शोध घेण्यात येत आहे. जखमीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

नेमकं काय झालं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते बॅनर लावत होते. पहाटे चारच्या सुमारास एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने आली आणि तिने त्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि तो तेथून फरार झाला. बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती. त्या कारचालकाने या दोन्ही कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यावर तो कारचालक थांबला नाही तर थेट ळूनच गेला. यात प्रीतम थोरात या इसमाचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.