बुजुर्ग व्यक्तीला घरी बोलावलं, गुंगीचं ड्रिंक देऊन अश्लील व्हिडीओ बनवला आणि मग… पुढे काय घडलं?
या प्रकरणी पोलिसांनी ५ महिलांना अटक केली आहे. या महिलांनी कट रचून एका वृद्ध दुकानदाराचा अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले होते. महिलांना रोख रक्कम घेताना पोलिसांनी पकडले अन्...

एका वृद्ध व्यक्तीला हनी ट्रॅप करून ब्लॅकमेल करणाऱ्या ५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर तीन महिलांना 50,000 रुपयांसह रंगेहात अटक करण्यात आली. तर इतर दोन जणांना नंतर रिमांड दरम्यान पकडण्यात आले आहे. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा एका 72 वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली की काही महिला त्याला ब्लॅकमेल करत आहेत. पोलिस तपासात समोर आले की, आरोपी महिलांपैकी रजनी ही अनेकदा वृद्ध व्यक्तीच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी जात होती.
एके दिवशी महिलेने वृद्धाला तिच्या एका ओळखीच्या मुलीला कामावर ठेवण्याची विनंती केली. वृद्धाने तिला दुकानात पाठवण्यास सांगितले होते. मात्र, त्या महिलेने चालकीने भाड्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीला आपल्या घरी बोलावले. महिलेने वृद्ध व्यक्ती घरी आल्यावर पिण्यास पाणी दिले. त्या पाण्यामध्ये कोणते तरी औषध टाकून त्याला बेशुद्ध केले. बेशुद्ध असलेल्या वृद्ध वक्तीसोबत एका महिलेने अश्लील कृत्य केले आणि त्याचा व्हिडीओ शूट केला.
वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?




पाच लाख रुपयांची जास्त मागणी
पोलिसांनी सांगितले की, यानंतर आरोपी महिलांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्ध व्यक्तीकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. नंतर दीड लाख रुपयांत सौदा ठरला आणि वृद्ध व्यक्तीने त्यांना ३० हजार रुपयेही दिले. त्यानंतर आरोपी महिला वृद्ध व्यक्तीकडे 50 हजार रुपये जास्तीची रक्कम मागत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी आरोपींकडून 60-65 हजार रुपये आणि एक मोबाईल फोन जप्त केला. या फोनमध्ये अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अन्य फरार महिला आरोपीचा शोध घेत आहे.
हनी ट्र्रॅप आणि ब्लॅकमेलिंग केले
हरयाणा येथील कर्नाल सेक्टर-4 चौकीचे प्रभारी सुलेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी महिलांनी दावा केला की ही पहिलीच घटना आहे ज्यामध्ये महिला हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगद्वारे वृद्धाला अडकवत होती. आता पोलीस चौकशी करून उर्वरित महिला आरोपी आणि उर्वरित रक्कम जमा करणार आहेत. आरोपी महिलांनी याआधी काय केले होते? तसेच त्यांनी आणखी कोणाला गोवले होते का? याचा तपास सुरु आहे.