Honey Trap | मिस्टर राजस्थान हनी ट्रॅपच्या जाळ्यात, 20 लाख उकळताना डान्सर रंगेहाथ अटक

पीडित तरुण पाच वर्षांपूर्वी आरोपी राधा सैनीच्या संपर्कात आला होता. सुमारे वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले. यानंतर तरुणीने त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली,

Honey Trap | मिस्टर राजस्थान हनी ट्रॅपच्या जाळ्यात, 20 लाख उकळताना डान्सर रंगेहाथ अटक
टॉफी खाल्ल्यानंतर चार मुलांचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:16 PM

जयपूर : जयपूरमध्ये हनी ट्रॅपचं (Honey Trap) प्रकरण समोर आलं आहे. मिस्टर राजस्थान (Mr Rajasthan) हा किताब पटकवलेला तरुण जाळ्यात सापडला. अश्लील फोटोंवरुन ब्लॅकमेल (Blackmail) केल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी महिला डान्सरला अटक केली आहे. 19.50 लाखांचा चेक आणि 50 हजारांची रोकड घेताना आरोपी युवतीला रंगेहाथ अटक केल्याचं जयपूर शहरातील संजय सर्कल ठाण्याच्या पोलिसांनी सांगितलं. राधा सैनी असं आरोपी तरुणीचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुण पाच वर्षांपूर्वी राधा सैनीच्या संपर्कात आला होता. त्यावेळी ती मेट्रोमध्ये काम करायची. सुमारे वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले. यानंतर तरुणीने त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली, असं डीसीपी जयपूर उत्तर परिदेश देशमुख यांनी सांगितलं. पीडित तरुणाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

तरुणीकडून पिच्छा सोडवून घेण्यासाठी त्याने वेगवेगळ्या वेळी सुमारे 6 लाख रुपये दिल्याचे पोलिसांनी सांगितले, मात्र त्यानंतरही तरुणीने त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी सुरूच ठेवली.

20 लाख घेताना रंगेहाथ अटक

यावेळी तरुणीने 20 लाख रुपयांची मागणी केली. प्रकरण गंभीर होत असल्याने तरुणाने पोलिसात तक्रार केली. 50 हजार रुपये रोख आणि 19.50 लाखांचा चेक देण्याबाबत पीडित आणि आरोपी तरुणीमध्ये सौदा झाला. डीलनुसार आरोपी तरुणी चांदपोल येथे पोहोचली, तिथे पोलिसांनी तिला रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात हनी ट्रॅपमध्ये अडकला वकील, व्हाट्सअप व्हिडीओच्या माध्यमातून तरुणीने संवादात अडकवले

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून आरोपीला अटक

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.