Agra : संचालकाचा तरुणीवर बलात्कार, व्हिडिओ बनवून मित्राला पाठवला आणि मग…
संचालकाच्या गैरकृत्यामुळे आग्र्यात खळबळ, क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचं सांगून अनेकवेळा बलात्कार, पाहा कशी तरुणीची फसवणूक...
उत्तर प्रदेश : प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार (Rape)केल्याची अनेक प्रकरणं आतापर्यंत उजेडात आली आहे. विशेष म्हणजे बलात्कार केल्यानंतर त्याचा व्हिडीओ (Video) बनवून ब्लॅकमेल करण्याचं सुद्धा आता प्रकरणात वाढ झाली आहे. आग्रा (Agra) येथे सुद्धा असाचं संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एत्माद्दौला या पोलिस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मागच्या नऊ महिन्यापुर्वी संचालकांनी पीडीत महिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला. त्याचवेळी त्याने व्हिडीओ सुद्धा तयार केला आहे. विशेष म्हणजे संचालकांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार शारिरीक शोषण केले. त्यानंतर तो व्हिडीओ त्यांच्या मित्राला पाठवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संचालक रामपाल सिंह आणि त्याचा मित्र मुकेश शर्मा यांची सद्या पोलिस कसून चौकशी करीत आहेत. मुकेशने स्वतःला दिल्ली क्राइम ब्रँचचा अधिकारी सांगून त्या पीडीत मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला आहे. मुकेशला वैतागल्याने तरुणीने पोलिस स्टेशन गाठले असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.