Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलाव कच्चा राहिला म्हणून हॉटेलमध्ये राडा, ग्राहकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

तिघे मित्र जोगेश्वरीतील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिघांनी चिकन पुलाव ऑर्डर केला होता. मात्र पुलाव थोडा कच्चा असल्याने तरुणांनी हॉटेल मालकाला सांगितले.

पुलाव कच्चा राहिला म्हणून हॉटेलमध्ये राडा, ग्राहकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
चिकन पुलाव खायला गेलेल्या तरुणांना हॉटेल चालकाकडून मारहाणImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 4:11 PM

मुंबई : हॉटेलमध्ये चिकन पुलाव खायला जाणे तिघा मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. पुलाव कच्चा राहिल्याने तरुणांचा हॉटेल मालकाशी वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की हॉटेल चालकाने तिघा तरुणांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने पाठीवर आणि खांद्यावर वार केले. याप्रकरणी तरुणांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखलक केली. तरुणांच्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 324, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अब्दुल समद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी हॉटेल चालकाचे नाव आहे.

पुलाव कच्चा असल्याचे सांगितल्याने मारहाण

तिघे मित्र जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिघांना चिकन पुलावची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर वेटरने तिघांना पुलाव सर्व्ह केला. तिघांना खाताना पुलाव कच्चा वाटला म्हणून त्यांनी हॉटेल मालक अब्दुल समद याला सांगितले. यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला.

वाद इतका विकोपाला गेला की, अब्दुल समद याने तिघांना मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, त्यानंतर त्याने चाकूने त्यांच्या पाठीवर आणि खांद्यावर वार केले. यात तरुण जखमी झाले. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

नागूपरमध्ये बारमध्ये तोडफोड

दोन दिवसापूर्वी दारुवरुन झालेल्या वादातून बारमध्ये तोडफोड केल्याची घटना नागपुरमध्ये मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्राम बारमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याने राडा घातला. टोळक्याने आधी पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली. मग बारमध्ये घुसून दारुच्या बाटल्या फोडत मॅनेजरला मारहाण केली.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.