मुंबई : हॉटेलमध्ये चिकन पुलाव खायला जाणे तिघा मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. पुलाव कच्चा राहिल्याने तरुणांचा हॉटेल मालकाशी वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की हॉटेल चालकाने तिघा तरुणांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने पाठीवर आणि खांद्यावर वार केले. याप्रकरणी तरुणांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखलक केली. तरुणांच्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 324, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अब्दुल समद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी हॉटेल चालकाचे नाव आहे.
तिघे मित्र जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिघांना चिकन पुलावची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर वेटरने तिघांना पुलाव सर्व्ह केला. तिघांना खाताना पुलाव कच्चा वाटला म्हणून त्यांनी हॉटेल मालक अब्दुल समद याला सांगितले. यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला.
वाद इतका विकोपाला गेला की, अब्दुल समद याने तिघांना मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, त्यानंतर त्याने चाकूने त्यांच्या पाठीवर आणि खांद्यावर वार केले. यात तरुण जखमी झाले. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दोन दिवसापूर्वी दारुवरुन झालेल्या वादातून बारमध्ये तोडफोड केल्याची घटना नागपुरमध्ये मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्राम बारमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याने राडा घातला. टोळक्याने आधी पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली. मग बारमध्ये घुसून दारुच्या बाटल्या फोडत मॅनेजरला मारहाण केली.