वेटरशी वाद जीवावर बेतला, हॉटेल मालकाने कोयताच चालवला.. मावळ हादरवणारं हत्याकांड

प्रसाद आणि अभिषेक येवलs या दोघांचे अक्षयच्या हॉटेलमधील वेटरशी वाद झाले होते, त्या वादातूनच प्रसादला त्याचा जीव गमवावा लागल्याचे समोर आले. यामुळे मावळ परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

वेटरशी वाद जीवावर बेतला, हॉटेल मालकाने कोयताच चालवला.. मावळ हादरवणारं हत्याकांड
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 1:17 PM

पुण्यातून गेल्या काळात गुन्ह्यांच्या अनेक हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता पुण्यातील मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथे एका हॉटेलच्या मालकाने त्याच्याच मित्राची हत्या केली आहे. हॉटेलमध्ये वेटरशी वाद झाल्यानेच हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले आहे. प्रसाद पवार असे मृत तरूणाचे नाव असून याप्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृत प्रसाद आणि अभिषेक येवले या दोघांचे अक्षयच्या हॉटेलमधील वेटरशी वाद झाले होते, त्या वादातूनच प्रसादला त्याचा जीव गमवावा लागल्याचे समोर आले. यामुळे मावळ परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मावळ येथील हॉटेल जय मल्हारमध्ये हा प्रकार घडला. मृत प्रसाद अशोक पवार आणि अभिषेक येवले या दोघांचा जय मल्हार हॉटेलमधील वेटरशी काही कारणावरून वाद झाला होता. त्यांनी त्या वेटरला मारहाण देखील केली होती. या वादाबद्दल समजल्यानंतर हॉटेल मालक अक्षयने त्या दोघांशी फोनवरून चर्चा केली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. दोघंही भांडू नका, मी तिकेड येत आहे, असे सांगितले. मात्र त्या दोघांनी फोनवरच हॉटेल मालक अक्षयला शिवीगाळ केली आणि ते तेथून निघून गेले.

त्यानंतर थोड्यावेळाने ते पुन्हा हॉटेलजवळ आले, त्यांच्या हातात कोयता होता. हॉटेलचा मालक अक्षय हा हॉटेल बंद करत होता. मात्र तेव्हाच प्रसाद आणि अभिषेकने त्याच्याशी वाद घातला. संतापलेल्या अक्षयने त्यांच्या हातातलाच कोयता घेऊन दोघांवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे उपचारांदरम्यान प्रसाद याचा मृत्यू झाला. तर अभिषेक हाँ गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेतय याप्रकरणाची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी अक्षयला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.