मुंबई पोलीस १ No. बलात्कारातील फरार आरोपीने बिहारमध्ये हजामतीसाठी ५० रुपये दिले, पण पोलिसांकडून जागीच त्याची बिनपाण्याची हजामत झाली
आरोपीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, तो मुंबईतून बिहार राज्यातील दरभंगा येथे पळून गेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला तिथून चलाखी दाखवत ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : बिहारच्या तरुणाने मागच्या महिन्यात बलात्कार केला, त्यानंतर तो मुंबईतून गायब झाला. त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याची शोधाशोध केली. परंतु तो मुंबईत कुठेही आढळून आला नाही. आरोपी मुंबईत (Crime News in Marathi) नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे तो कुठे आहे याची माहिती मिळत नव्हती. तो बिहारमधील दरभंगा (Bihar Darbhanga) येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचबरोबर त्याच्या गावापासून काही अंतरावरती त्याची बहीण सुध्दा राहत असल्याची माहिती पोलिसांना (Mumbai Police) मिळाली होती.
सोशल मीडियावर एका तरुणीची ओळख झाल्यानंतर आरोपीने त्या तरुणीला लग्न करण्यात आश्वासन दिलं होतं. ज्यावेळी ती तरुणी गरोदर राहिली, त्यावेळी तिला त्याने गर्भपात करण्यास भाग पाडले असं त्या तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्यावरती भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे), 417 (फसवणुकीसाठी शिक्षा) आणि 506 (2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
ज्यावेळी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाली, त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली. परंतु तो घरातून फरार झाला होता. त्याचबरोबर त्याचा मोबाईल सुध्दा बंद होता अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितली आहे.
पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरु केली, त्यावेळी तो नेपाळला पळून गेला असल्याचा पोलिसांना संशय होता. तरी सुध्दा पोलिसांनी त्याचं बिहार राज्यातील गाव आणि आजू बाजूच्या गावांची माहिती घेतली. तो नेपाळच्या सीमेवर असल्यामुळे तो पळून तिकडं गेल्याची पोलिसांना शंका होती. त्याचबरोबर त्याची बहीण सुध्दा तिथल्या जवळच्या गावात राहत असल्याची माहिती पोलिसांना होती.
११ मे रोजी पोलिसांचे पथक दरभंगा दाखल झाले
ज्यावेळी मुंबई पोलिसांचं पथक त्याच्या बहिणीच्या घरी गेले, त्यावेळी आरोपी तिथचं घरात होता. मात्र आरोपी घरात असल्याची खात्री नसल्यामुळे पोलिस घरात गेले नाहीत. त्याच्या बहिणीच्या घरी पोलिस गेले नसते, तर आरोपीने तिथून सुध्दा पळ काढला असता. पोलिसांनी तिथं काहीवेळी थांबण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी त्याच्या बहिणीच्या घराबाहेर पोलिस उभे होते. पोलिसांनी त्याचे बँकेतील अकाऊंट अपडेट पाण्यासाठी एका कर्मचाऱ्याला पाठवले. त्यावेळी तिथल्या एका सलूनमध्ये आरोपीने ५० रुपयाचं ऑनलाइन व्यवहार केला असल्याचे निर्दशनास आले, त्यानंतर पोलिसांना आरोपी तिथचं असल्याचा संशय बळावला.
पोलिसांनी आरोपी तिथचं असल्यामुळे तपास जलदगतीने सुरु केला. डिजिटल पेमेंट कंपनीकडून ज्या व्यक्तीला व्यवहार केला आहे, त्याचे नाव आणि नंबर मिळवला. पोलिसांनी तिथल्या सलून चालकाची चौकशी केली. हे सलून आरोपीच्या बहिणीच्या घरापासून फक्त ५० मीटर अंतरावर आहे.
पोलिसांनी काही फोटो त्या सलून चालकाला दाखवले, आरोपीची खात्री झाल्यानंतर, पोलिस त्याच्या बहिणीच्या घरी रात्री उशिरा गेले, आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला मुंबईत आणण्यात आले, त्याचबरोबर आरोपीने गुन्हा देखील मान्य केला आहे. सध्या तुरुंगात असल्याचे पोलिसांनी सांगितले.