ट्रेनमध्ये समोसे विकणाऱ्या अब्दुल करीम तेलगीला कशी सुचली स्टॅंम्प घोटाळ्याची आयडीया, आता तेलगीवर वेबसिरीज

तेलगीचे वडील रेल्वेत कामाला होते. त्यांचा कुटुंब निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडीलांच्या मृत्यूनंतर तेलगीने ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ विकले.

ट्रेनमध्ये समोसे विकणाऱ्या अब्दुल करीम तेलगीला कशी सुचली स्टॅंम्प घोटाळ्याची आयडीया, आता तेलगीवर वेबसिरीज
telgi Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 2:08 PM

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 :  ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ च्या यशानंतर डायरेक्टर हंसल मेहता आता ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ ची कहानी घेऊन आली आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर चार ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. स्कॅम 1992 सारखेच हंसल मेहता यांची मालिका भारतातील आणखी एका महा घोटाळ्याला स्क्रीनवर आणणार आहे. ही सिरीज अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर केंद्रीत आहे, त्याने नाशिक सिक्यूरिटी प्रेसमधील प्रिटींग मशिन लिलावात मिळून स्टॅम्प पेपर छापत समांतर महसूल मिळविणारी यंत्रणा तयार केली. हसंल मेहता यांनी ही मालिका पत्रकार संजय सिंहद्वारा लिहीलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ च्या आधारे तयार करण्यात आली आहे.

कोण होता अब्दुल करीम तेलगी ?

तेलगीचा जन्म कर्नाटकातील छोट्या गावात खानापूरात 1961 मध्ये झाला. तेलगीचे वडील रेल्वेत कामाला होते. त्यांचा कुटुंब निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडीलांच्या मृत्यूनंतर तेलगीने ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ विकले. यातून न भागल्याने तेलगी सौदी अरबियात गेला. परत आल्यानंतर त्याने नकली पासपोर्ट बनविण्यात हात आजमाविला. नंतर नकली स्टॅंम्प बनविण्यास सुरुवात केली. कायदेशीर दस्ताऐवज प्रमाणीकरण करण्यासाठी स्टॅंप पेपरचा वापर केला जातो. सरकार नोंदणीकृत विक्रेत्याद्वारे स्टॅंप पेपर विकते. 10 रु., 100 रु.,500 रु. अशा किंमतीला स्टॅंप पेपर विकले जातात. स्टॅंपचे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा होतात.

कसा झाला स्टॅंप पेपर घोटाळा ?

त्याकाळात दस्ताऐवज नोंदणीकरणासाठी स्टॅंप पेपरची टंचाई होती. तेव्हा तेलगीने याचा फायदा उचलला. त्यावेळी तेलगी नकली स्टॅंप बाजारातून आणून विकले. 1990 च्या दशकात हे स्टॅंप सर्रास विक्री झाले. तेलगीने नाशिकच्या इंडीयन सिक्युरिटी प्रेस मधून काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन लिलावात काही छपाई मशिन मिळवून हुबेहुब स्टॅंप पेपर छापणे सुरु केले. त्यामुळे सरकारी यंत्रणाच पोखरल्याने देशभर हा घोटाळा पसरला.

कसा पकडला तेलगी ?

नकली स्टॅंपचे एक प्रकरण 1991 आणि दुसरे प्रकरण 1995 मध्ये दाखल. मुंबई पोलिसांच्या ढील्या तपासाने तेलगी वाचला. 2002 मध्ये पुणे शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमाकांत काळे आणि अजित काळे यांना मिळालेल्या सूचनेनूसार नकली स्टॅंप प्रकरणात काही लोकांना अटक झाली. त्यांच्या चौकशीनंतर तेलगीचे नाव आले. तेलगीला काही महिन्यांपूर्वी 2001 मध्ये फसवणूक प्रकरणात अटक केली होती. नंतर तो बंगळुरु जेलमध्ये बंद होता. जनतेचा दबाव वाढल्याने महाराष्ट्र सरकारने एसआयटी स्थापन  केली. त्यानंतर तेलगी घोटाळ्याची व्याप्ती समोर आली. अनेक सरकारी अधिकारी , पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्ती या घोटाळ्यात अडकले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.