MPSC पास दर्शना पवार प्रकरणातील आरोपी राहुलने दिला कबुली जबाब, दर्शनाला प्रपोझ केलं अन…

Pune Darshana Pawar Case : ज्या मित्रासोबत एकत्र अभ्यास केला त्यानेच तिला संपवलं. आरोपी राहुल हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने दर्शना पवार हिच्या हत्येचा कबुलीजबाब दिला आहे. 

MPSC पास दर्शना पवार प्रकरणातील आरोपी राहुलने दिला कबुली जबाब, दर्शनाला प्रपोझ केलं अन...
Darshana pawar murder caseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 8:01 PM

पुणे : पुण्यामध्ये MPSC पास दर्शना पवार हिच्या हत्याकांडाने सर्वांनाचा धक्का बसला होता. MPSC परीक्षा पास झाल्यावर तिचा जवळचा मित्र असलेल्या राहुल हांडोरे यानेच तिला संपवलं होतं. पुण्यामधील राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला त्यानंतर ओळख पटली आणि दर्शना पवारचा मृतदेह असल्यांचं समोर आलं होतं. ज्या मित्रासोबत एकत्र अभ्यास केला त्यानेच तिला संपवलं. आरोपी राहुल हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने दर्शना पवार हिच्या हत्येचा कबुलीजबाब दिला आहे.

कबुलीजबाबामध्ये काय म्हणाला राहुल हांडोरे?

मी आणि दर्शन एकत्र अभ्यास करायचो, यादरम्यान मी तिला प्रपोजही केलं होतं. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मी तिला मदत केली होती. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर तिने माझ्यासोबत लग्नाला नकार दिला. याचाच राग मला आणि मी तिला संपवयचं ठरवल्याचं आरोपी राहुल हांडोरे याने सांगितलं.

12 जूनला दोघे गडावर ट्रेकसाठी गेलो होतो. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये वाद झाला, त्यावेळी मी माझ्याजवळील ब्लेडने तिच्यावर वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात मोठा दगड घातल्याचं राहुल हांडोरोने सांगितलं. ही सर्व माहिती पोलिसांना कबुलीजबाबात राहुल हांडोरे याने दिली.  राहुलने दर्शनाला संपवत तिथून एकटा माघारी गेला, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे  दिसलं. पोलिसांनी हा एक पुरावा सर्व काही सांगत होता. त्यानुसार पोलिसांनी आपली सुत्रं हलवली आणि त्याचा तपास सुरू  केला.

राहुल फरार झाला आणि बाहेर असताना आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून तो दुसऱ्यांचे फोन घेऊन संपर्क साधत होता. पोलिसांनी नातेवाईकाच्या फोनच्या मदतीने सापळा रचला आणि त्यामध्ये तो अडकला.  पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आलं की दर्शना आणि तो लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते.

दरम्यान, राहुल हांडोरे स्वत: MPSC तयारी करत होता. कर्वेनगर भागात तो वास्तव्यास होता. अभ्यास करता करता तो डिलिव्हरी बॉयचंही तो काम करत होता. दर्शनाच्या नकाराने तिला आपला जीव गमवावा लागला. राहुल हांडोरे हा आता पोलीस कोठडीत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.