राजस्थानातील दोघांकडून पुणेकरांचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड, ब्लॅकमेल केल्यानंतर पीडितांची सायबर सेलकडे धाव

पुणेकरांना आपल्या जाळ्यात ओढून या भामट्यांनी त्यांचे कपडे उतरवले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या प्रकारात फसवणूक झालेले आतापर्यंत 100 पुणेकर समोर आले आहेत.

राजस्थानातील दोघांकडून पुणेकरांचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड, ब्लॅकमेल केल्यानंतर पीडितांची सायबर सेलकडे धाव
Blackmailing
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:57 AM

पुणे : राजस्थानमधील दोन नराधमांनी शेकडो पुणेकरांची नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन ब्लॅकमेलिंग सुरु केलं आहे. या दोन बदमाशांनी पुणेकरांची झोप उडवली आहे. ब्लॅकमेलिंग सुरु झाल्यावर आपली इभ्रत वाचवण्यासाठी पुणेकरांनी सायबर सेलकडे धाव घेतलीय. हा संपूर्ण प्रकार 2021 च्या सुरुवातीपासून चालू होता. त्यात अनेक पुणेकरांना आपल्या जाळ्यात ओढून या भामट्यांनी त्यांचे कपडे उतरवले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या प्रकारात फसवणूक झालेले आतापर्यंत 100 पुणेकर समोर आले आहेत. (Hundreds of Punekars blackmailing by recording nude videos)

फसवणूक झालेल्या पुणेकरांची संख्या 100 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. पण अनेकजण लाजेखातर पुढे येण्यास तयार नाहीत. या प्रकरणात पुण्याच्या सायबर क्राईम पोलिसांनी राजस्थानमधील दोघांची ओळख पटवली आहे. सध्या हे दोन्ही भामटे राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहे. जानेवारी महिन्यापासून पुण्यातील अनेकांशी त्यांनी मैत्री केली. त्यानंतर त्यांचे नंबर सार्वजनिक करुन त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे नग्न होण्याची विनंती करायचे. पुणेकरांनी अंगावरील एक एक कपडे उतरवायला सुरुात केल्यावर स्क्रीनवर व्हिडीओ रेकॉर्डर स्वॉफ्टवेअरद्वारे ते रेकॉर्ड करायचे आणि ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करायचे.

100 तक्रारी, 8 गुन्हे दाखल

या प्रकरणी तक्रारी यायला सुरुवात झाल्यानंतर पुणे साबर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासाचे धागेदोरे राजस्थानपर्यंत जाऊन पोहोचले. सध्या राजस्थान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या भामट्यांना त्यांचा तपास पूर्ण झाल्यावर ताब्यात घेऊ असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. जानेवारी 2021 पासून पुणेकरांची फसवणूक सुरु आहे. आतापर्यंत 100 जणांनी याबाबत तक्रार केलीय. त्यापैकी 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर पोलिसांच्या पथकानं आरोपी वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे आयपी एड्रेस आणि बँक खात्याचा तपशील मिळवलाय.

या प्रकरणात राजस्थान कनेक्शन समोर आल्यानंतर पुणे पोलिसांचं एक पथक राजस्थानला पोहोचलं. तिथेही अशाच प्रकारे लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना राजस्थान पोलिसांनी आधीच अटक केली होती. राजस्थान पोलिसांचा या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींचा ताबा घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या भामट्यांनी आतापर्यंत अनेकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

कशी व्हायची फसवणूक?

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून पीडित व्यक्तीला महिलांच्या नावे फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली जायची. त्यासाठी फेसबुकवर महिलांचं बनावट अकाऊंट तयार केलं जायचं. त्यावर एखाद्या सुंदर महिलेचा फोटो प्रोफाईल म्हणून ठेवला जायचा. फ्रेन्ड रिस्केस्टचा स्वीकार केल्यानंतर मेसेंजर मुलगी असल्याचं भासवत पुढील व्यक्तीशी संवाद साधला जायचा. काही दिवस गप्पा मारल्यानंतर समोरील व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळवला जायचा. फोन नंबर घेऊन व्हाईस मॉड्युलेशन सॉट्फवेअर वापरुन स्त्रीच्या आवाजात ते दोघे समोरील व्यक्तीशी बोलायचे.

गप्पा चांगल्या रंगात आल्यावर आरोपींनी काही महिलांचे अगोदरच चित्रिकरण केलेल व्हिडीओ प्ले केले. त्यात या महिला स्वत: नग्न होऊन पीडित पुरुषांना नग्न होण्याची विनंती करत होत्या. त्यांच्या या सगळ्या प्रकारात वाहवत जाणाऱ्या पुणेकरांकडूनही मग नग्न होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भामट्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर वापरुन व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरुवात व्हायची.

संबंधित बातम्या : 

कुख्यात गुंडांची टोळी, कमी किंमतीत सोनं देतो सांगून नकली नाणे द्यायचे, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, जंगलात थरार

VIDEO : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी, पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद

Hundreds of Punekars blackmailing by recording nude videos

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.