शेजाऱ्यांना खिडकीतून ते पाहिलं अन् सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली, काय घडले नेमके?

सकाळी शेजारी उठले तर शेजारच्या खिडकीतून भलतचं चित्र दिसले. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. जे घडले ते का घडले याची कुणालाच कल्पना नाही.

शेजाऱ्यांना खिडकीतून ते पाहिलं अन् सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली, काय घडले नेमके?
अज्ञात कारणातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:32 PM

कुणाल जयकर, TV9 मराठी, अहमदनगर : नगरमध्ये धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अज्ञात कारणातून पतीने पत्नीची हत्या करत स्वतःही जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरात ही खळबळजनक घटना घडली. आशा गुजर असे पत्नीचे तर संदिप गुजर असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संदिप गुजर यांनी हत्या आणि आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. कोतवाली पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

‘अशी’ झाली घटना उघड

शेजाऱ्यांना खिडकीतून गुजर यांचा मृतदेह दिसला. यानंतर शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेजाऱ्यांनी तात्काळ कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात जाऊन पाहिले असता बाथरुममध्ये पत्नीचा मृतदेह दिसला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

गुजर दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा अशी चार मुले आहेत. तिन्ही मुलींची लग्न झाली असून, मुलगा पुण्यात नोकरी करतो. गुजर यांचा इडलीचा व्यवसाय होता. गुजर यांनी आधी पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह बाथरुममध्ये टाकला. मग स्वतः जीवन संपवले. पण गुजर यांनी असे का केले याबाबत अद्याप उलगडा झाला नाही.

हे सुद्धा वाचा

हत्या आणि आत्महत्येचे कारण अस्पष्ट

कौटुंबिक वादातून, व्यावसायिक अडचणीतून की अन्य काही कारणाने संदिप गुजर यांनी टोकाचे पाऊल उचलले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंती घटनेमागचे रहस्य उलगडेल. कोतवाली पोलिसांनी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच मयत आरोपीचा वेगळा ADR दाखल करत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.