Crime Story : नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने पती-पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला, पोलिस…
घरी गेल्यानंतर पैसे मागण्यासाठी कशाला आले म्हणून नरेश यांचा मुलगा रुपेश येडेकर व लहान भाऊ ओम येडेकर यांनी तिघांनाही मारहाण केली.
भंडारा : नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या पती-पत्नी एकाने लोखंडी रॉडने हल्ला (Attack with an iron rod) केला आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये (Bhandara police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या पती पत्नीला लाखनी रुग्णालयात (lakhani hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता पोलिस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तिघांना घरी बोलावून मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी सिंदीपार मुंडीपार येथे गेलेल्या नितीन शामकुंवर यांच्यासह त्यांची पत्नी व साळ्याला आरोपी नरेश येडेकर यांच्या भावांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रकरणी 3 आरोपी विरुद्ध लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंद आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आरोपी नरेश येडेकर यांची आतेगाव येथे स्वतः ची संस्था आहे. त्यांनी जखमी नितीन शामकुंवर यांच्याकडून त्यांचा साळा नितीन मेश्राम यास लिपिकाची नोकरी लावण्यासाठी 2011-12 मध्ये 12 लाखाची मागणी केली. फिर्यादीने स्वतः ची शेती विकून पाच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर देणार होते. रक्कम दिल्यावर फिर्यादी व आरोपीने नोटरी केली होती. आरोपी नरेशने जखमी नितीन शामकुंवर, त्याचा साळा नितीन मेश्राम व त्याची बहीण असे तिघांनाही फोन करून पैसे परत नेण्यासाठी बोलविले होते.
घरी गेल्यानंतर पैसे मागण्यासाठी कशाला आले म्हणून नरेश यांचा मुलगा रुपेश येडेकर व लहान भाऊ ओम येडेकर यांनी तिघांनाही मारहाण केली. कसेबसे जखमी अवस्थेत लाखनी पोलिस स्टेशनला पोहचत त्यांनी आपली हकीकत सांगितली, त्यानंतर लागलीच जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येडेकर बंधुवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.