दोघांचही तिसरं लग्न होतं, तिने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला… कुठे घडली ही भयानक घटना ?
Delhi Crime News : पती -पत्नीमध्ये वाद होणं कॉमन आहे. पण काही वेळ भांडण इतकं वाढंत की वाद टोकाला जाऊन होत्याचं नव्हतं होउन बसतं. दिल्लीतही असंच कांड झालंय.
संसार म्हटलं की प्रेम आलं तसंच रुसवे-फुगवेही आलेच. पत्नी-पत्नीच्या नात्यात वादही होतातं, भांडण होतं, पण काहीवेळा भांडण इतक वाढतं आणि रागाच्या भरात माणूस नको ते करून बसतो. मग हातात फक्त पश्चाताप उरतो बाकी काही नाही. राजधानी दिल्लीतही असंच काहीसं कांड झालंय. तिथे पती-पत्नीच्या भांडणानंतर जे झालं त्याने अख्खा संसारच उद्ध्वस्त झाला. पतीशी भांडण झाल्यावर पत्नी एवढी चिडली आणि तिने असं कांड केलं की थेट पोलिसांनाच बोलवावं लागलं. पत्नीने तिच्याच पतीचा प्रायव्हेट पार्टकापून टाकाला
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठलं तर तिथे तो इसम रक्ताच्या थारौळ्यात पडला होता आणि वेदनेने व्हिवळत होता. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्याच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. पतीची ही अवस्था करणारी ती बायको मात्र सध्या फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पीडित इसम आणि आरोपी महिलेचा हा तिसरा विवाह होता आणि दोघेही नुकतेच बिहारमधून दिल्लीला आले होते.
नेमकं काय झालं ?
पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिने प्रायव्हेट पार्टच कापला, अशी तक्रार एका इसमाने केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. यासंदर्भातील पीडित इसमाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजे. त्या इसमाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. मात्र आरोपी पत्नी फरार झाली असून तिच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
दोघांचही तिसरं लग्न होतं
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचही हे तिसरं लग्न होतं. काही दिवसांपूर्वीच ते बिहारमधून दिल्लीत शिफ्ट झाले. पीडित इसम शक्तीनगरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये काम करत होता. दिवाळीच्या रात्री तो मध्यरात्री घरी आला, पण तेव्हा तो नशेत होता. तेव्हा रात्री त्याचे बायकोशी कोणत्या तरी कारणावरून वाजं, त्यांचं मोठं भांडण झालं. त्यानंतर त्याची पत्नी घरातून निघऊन गेली. मात्र थोड्या वेळाने ती परत आली आणि धारदार शस्त्राने तिने पतीवर हल्ला केला.तिने थेट त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. गंभीर जखमी झालेल्या पतीला आधी हिंदू राव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर त्याला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.