3 महिन्यांपूर्वी थाटामाटात लग्न केलं, सप्तपदी घेतल्या , त्यांनीच विष खाऊन एकत्र संपवलं आयुष्य… पती-पत्नीने असं का केलं?
गाझियाबादमध्ये एका जोडप्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता, यावरून पत्नीने आधी गव्हाच्या डब्यात ठेवलेली सल्फासची गोळी खाल्ली. पत्नीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून भेदरलेल्या पतीनेही विष प्राशन केले, त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अवघ्या तीन महिन्यांपूरीवच त्यांच्या घरात सनईचे सूर घुमले, ढोल-ताशांच्या गजरात, थोरामोठ्यांच्या आशिर्वादात त्यांनी सप्तपदी घेतल्या. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण अवघ्या तीन महिन्यांतच त्यांच्या घरावर आता शोककला पसरली आहे. नुकतंच लग्न झालेल्या नवविवाहीत जोडप्याने शुल्लक वादावरून टोकाचं पाऊल उचलून अख्खं आयुष्यच पणाला लावलं. पतीशी शुल्लक कारणावरून वाद झाला, पत्नी संतापली आणि तिने गव्हाच्या डब्यात ठेवलेली सल्फासची गोळी खाल्ली. तिची तब्येत बिघडून ती खाली कोसळली, ते पाहून पतीही सैरभैर झाला आणि त्यानेही तशीच कृती केली. हा प्रकार घरच्यांना कळताच त्यांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
मुरादनगर शहरातील शिवाचा तीन महिन्यांपूर्वी रायसपूर गावात राहणाऱ्या भावना हिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही सुखाने जगत होते, मात्र काही दिवसांनी शिवाला लिव्हर इन्फेक्शन झाले. काम सोडून तो घरीच राहू लागला. शिवाचे वडील गाझियाबाद महापालिकेत स्वच्छता कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी ते त्यांच्या कामानिमित्त महापालिकेत आले होते.
पती-पत्नीमध्ये वाद आणि..
तेवढ्यात शिवाच्या वडिलांना एक फोन आला. मुलगा शिवा आणि सुनेने विष प्राशन केले असून दोघांचा मृत्यू झाला आहे,असे त्यांना कोणीतरी सांगितलं. ही बातमी ऐकून त्यांना धक्काच बसला. कसेबसे ते घरी पोहोचले, तेथे एकच गोंधळ होता. छोट्याशा वादावरून शिवा-भावनाने विष प्राशन करून अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांनी दोघांमधील वाद शांत केला होता, मात्र पुन्हा एकदा दोघांमधील वाद चांगलाच वाढला आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
वादानंतर शिवाची पत्नी भावना हिने तेथे ठेवलेली सल्फासची गोळी खाल्ली. सल्फा खाल्ल्यानंतर भावनाची प्रकृती बिघडली आणि ती खाली कोसळली. ते पाहून सैरभैर झालेल्या शिवानेही भावनेच्या भरात तीच गोळी खाल्ली. दोघांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मृतदेह
भावना आणि शिवाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यावरून आज पुन्हा वाद झाला. या रागातून पत्नीने विष प्राशन केले. पत्नीची अवस्था पाहून पतीनेही विष प्राशन केले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले .