नवरा-बायको रात्री खोलीत झोपायला गेले, सकाळी पाहिले तर धक्काच बसला; ‘त्या’ खोलीत असं काय घडलं?

अवघ्या काही महिन्यांपूर्वी लग्न झालेलं जोडपं रात्री झोपायला त्यांच्या खोलीत गेलं. पण सकाळी बऱ्याच उशीरापर्यंत बाहेरच आले नाही. म्हणून कुटुंबियांनी जोर लावून दरवाजा उघडला असता जे दृश्य दिसलं ते पाहून...

नवरा-बायको रात्री खोलीत झोपायला गेले, सकाळी पाहिले तर धक्काच बसला; 'त्या' खोलीत असं काय घडलं?
गोंदियात जुन्या वादातून तरुणाला संपवले
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 3:17 PM

हजारीबाग ( झारखंड) : हजारीबागच्या बरकठ्ठा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वरवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे नवविवाहित जोडप्याचा मृतदेह (body found in room) त्यांच्या घरातील एका खोलीत आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह बेडवर तर पतीने गळ्याला फास लावून घेतल्याचे  (husband and wife killed themselves) आढळून आले. नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून दोघेही खोलीत झोपायला गेले. मात्र सकाळी खोलीत दोघांचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरवा गावातील रहिवासी हिरामण यादव यांचा मुलगा 25 वर्षीय राजकुमार याचा विवाह 22 वर्षीय पूजा देवी हिच्यासोबत 22 फेब्रुवारी 2023 रोजी झाला होता. राजकुमार यादव हा मुंबईत कामाला होता आणि आठ दिवसांपूर्वी घरी आला होता. तीन दिवसांपूर्वी मुलीचा मेव्हणा इथे आला होता. तेव्हापासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता, असे समजते.

काल रात्री जेवण करून दोघेही खोलीत झोपायला गेले. मात्र सकाळी उशिरापर्यंत ते खोलीबाहेर न पडल्याने नातेवाइकांनी दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून एखा व्यक्तीने खिडकीतनू डोकावले असता, राजकुमारने गळफास लावून घेतल्याचे आढळले तर पूजाचा मृतदेह बेडवर पडलेला होता. त्यानंतर नातेवाईकांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर इतर लोकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून सर्वांनी आत प्रवेश केला.

नातेवाइकांनी पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. बरकठ्ठा पोलिस स्टेशनचे प्रभारी विक्रम कुमार यांनी सांगितले की, या जोडप्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून विविध पैलूंचा तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.