चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला करत होता मारहाण, वाचवायला आलेल्या सासूवरही हल्ला; मग…

चारित्र्यावर संशय घेत पती नेहमी पत्नीशी भांडण करायचा. हेच भांडण विकोपाला गेले अन् पतीच्या हातून नको ते होऊन बसले. यानंतर पतीची थेट तुरुंगात रवानगी करण्याची वेळ आली.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला करत होता मारहाण, वाचवायला आलेल्या सासूवरही हल्ला; मग...
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 5:13 PM

वाशीम : महाराष्ट्राच्या विदर्भातील वाशिम जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पत्नीसोबत होणाऱ्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे घातले. याचदरम्यान भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या सासूवरही जावयाने जीवघेणा हल्ला केला. डोक्यामध्ये फावड्याने वार केल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळलेल्या सासूबाईचा घटनास्थळीच काही वेळात मृत्यू झाला. तसेच हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आरोपीच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. आरोपी अब्दुल हाफीज हा माथेफिरू असल्याचे समजते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिच्यावर फावड्याने हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुलीला वाचवायला गेली आणि स्वतःचाच प्राण गमावून बसली

आरोपी अब्दुल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत नेहमीच भांडण करायचा. रोजच्या भांडणाला सासरची मंडळीही वैतागली होती. याच काळजीपोटी आरोपीची सासूबाई अधूनमधून मुलीकडे येऊन तिची विचारपूस करत असायची. घटना घडली त्यावेळीही सासूबाई नेहमीप्रमाणे चौकशीसाठी मुलीच्या घरी आली होती. याचवेळी अब्दुल पत्नीशी भांडण होता. भांडण सुरू असतानाच अब्दुलने फावडे उचलून पत्नीच्या डोक्यात घातले.

यावेळी मुलीला वाचवण्यासाठी सासुबाईने मध्यस्थी केली असता अब्दुलने तिच्याही डोक्यात फावड्याने वार केला. यात सासूबाई रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त गेल्यामुळे सासूचा काही मिनिटांतच जागीच मृत्यू झाला. अब्दुलच्या पत्नीला गंभीर अवस्थेत औरंगाबाद येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला

पत्नी आणि सासूवर हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. तो फरार झाल्याने परिसरात शोधाशोध सुरू करण्यात आली होती. याचदरम्यान त्याने दुसऱ्या परिसरात जाऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.