मुलाच्या हव्यासापोटी गर्भवती पत्नीचा गळा दाबला, बेशुद्ध अवस्थेत डोंगरात फेकले; असे वाचले महिलेचे प्राण
पदीमनी जिना हा मुंबईतील रहिवासी असून त्याचा प्रेमलताशी विवाह झाला आहे. या जोडप्याला दोन मुली आहेत. पण पदिमनी याला मुलगा हवा होता.
सांगली : मुलगा (Son) होत नसल्याने पतीकडून गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) करत मृत समजून तिला डोंगरात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आटपाडीच्या काळेवाडी येथे ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा (Case) दाखल केला आहे. प्रेमलता पदीमनी जिना असे 30 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. पती पदीमनी जिना आणि संपत मामा नामक व्यक्तीच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
गर्भलिंग चाचणी करण्यासाठी मुंबईतून साताऱ्यात आणले पत्नीला
पदीमनी जिना हा मुंबईतील रहिवासी असून त्याचा प्रेमलताशी विवाह झाला आहे. या जोडप्याला दोन मुली आहेत. पण पदिमनी याला मुलगा हवा होता. यामुळे गर्भवती पत्नीला तुझ्या पोटात मुलगा आहे का मुलगी ? याची तपासणी करायचे असे सांगत, तिला मुंबईमधून सातारा येथे आणले.
मृत समजून बेशुद्ध पत्नीला डोंगरात फेकले
साताऱ्यात संपत मामा नामक व्यक्तिच्या गाडीतून आटपाडीकडे घेऊन जात असताना पत्नी प्रेमलता हिचा गळा आवळला. यात प्रेमलता ही बेशुद्ध झाली होती. मात्र आपली पत्नी मृत झाल्याचे समजून त्याने पत्नीला बेशुद्धावस्थेत आटपाडी तालुक्यातल्या कोळीवाडी येथील चिंचघाट डोंगरात फेकून दिले.
शुद्धीवर येताच महिलेने ग्रामस्थांना आपबीती सांगितली
काही वेळानंतर प्रेमलताला शुद्ध आली आणि त्यानंतर तिने गावात पोहोचून आपल्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी आटपाडी पोलिसांशी संपर्क करत केला. त्यानंतर पोलिसांनी प्रेमलता हिला सांगलीचे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी पदीमनी जिना आणि संपत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Husband attempt to killed pregnant wife for want of son)