ती रडत होती अन् तो हसत राहिला, लग्नाच्या 11 वर्षानंतर पतीने केला पत्नीचा छळ, चिमट्याने…
एका हृदयद्रावक घटनेत एका पतीने पत्नीचा अनन्वित छळ केल्याची घटना समोर आली आहे. तिला भूतबाधा झाल्याचे सांगून राक्षसी पतीने हे कृत्य केले.

Crime News : चुरू जिल्ह्यात पतीच्या क्रूरतेची (Cruelty) खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीला डायन म्हणत त्याने तिला गरम चिमट्याने चटका दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी डायन असल्याचे सांगत तिच्यावर भूत-प्रेताची सावली पडल्याचा दावाही त्याने केला. आणि तिला जागोजागी गरम चिमट्याने डागले. राजस्थानच्या चुरू येथील या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस स्टेशनमध्ये चालवल्या जाणार्या महिला सुरक्षा आणि समुपदेशन केंद्रात जाऊन तक्रार नोंदवली. हैवान पतीपासून वाचवा अशी विनंती तिने पोलिसांना केली. तसेच पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या छळाला कंटाळून २८ वर्षीय महिला तिच्या पिहार गावी बुंटिया येथे आली. तिथे तिने सरपंच बंशीधर यांना आपला त्रास कथन केला. त्यानंतर सरपंच बंशीधर यांनी पीडितेला चुरू महिला पोलिस स्टेशनमध्ये चालवण्यात येणाऱ्या महिला सुरक्षा केंद्रात पाठवले. येथे महिलेने सांगितले की, 11 वर्षांपूर्वी तिचे लग्न सुजानगढ तहसीलमधील गोपालपुरा गावात राहणाऱ्या शेरारामसोबत झाले होते. तिचा नवरा दारुड्या आहे.
दारू पिऊन पती करतो मारहाण
दारू पिऊन पती पैशांची मागणी करतो, यावरू घरात रोज वाद सुरू असतो. तो आपल्याला मारहाणही करतो, असा आरोप पीडितेने केला आहे. पतीने तिला डायन म्हटले आणि गरम चिमट्याने तिच्या अंगावर डाग चटके दिले, असेही महिलेने तक्रारीत नमूद केले. 11 जून रोजीही आरोपी पतीने दारू पिऊन मारहाण केली. नंतर डायन म्हणत गरम चिमट्याने पाठीवर चटका दिल्याचेही तिने सांगितले.
माहेरी पोहोचून कथन केला त्रास
भाजल्यामुळे आपण ओरडत होतो, पण पतीवर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तिने तिच्या माहेरी जाऊन सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला गावच्या सरपंचांकडे नेले. सरपंचाने दोघींनाही महिला पोलीस ठाण्यात चालवल्या जाणाऱ्या महिला सुरक्षा व समुपदेशन केंद्रात नेले. पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे.