पत्नीचा राग काढण्यासाठी परिसरातील गाड्या जाळल्या, वाचा कुठे घडली ही घटना?

पती कामधंदा करत नसल्याने पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला. पतीला घटस्फोट नको होता. मात्र पत्नी ऐकायला तयार नसल्याने तो संतापला. मग जे घडलं त्यानंतर थेट पोलीस ठाण्यातच गेला.

पत्नीचा राग काढण्यासाठी परिसरातील गाड्या जाळल्या, वाचा कुठे घडली ही घटना?
पुण्यात वाहनांची जाळपोळImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 4:13 PM

पुणे / अभिजीत पोते : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा राग काढण्यासाठी पतीने परिसरातील गाड्याच जाळल्याची खळबळजनक घटना घडली. पुण्यातील कोंढवा भागात सोमवारी पहाटे हा अजब प्रकार घडला आहे. आरोपीने चार दुचाकी, एक चार चाकी आणि एका रिक्षाला आग लावली. टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव आहे. पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून चिडलेल्या नवऱ्याने गाड्या पेटवल्या. पोलिसांनी टेरेन्सला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

पती कामधंदा करत नसल्याने पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी पहाटे 5 वाजता घडला. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता, म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दिला. पत्नीसोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको, असे सांगितले. तरीही त्याच्या पत्नीने अर्ज दाखल केला.

हे सुद्धा वाचा

घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉनने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. मग यावेळी पार्किंगमध्ये असलेल्या इतर दुचाकिंसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.

पिंपरी चिंचवडमध्येही वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड शहरामधील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. रुपीनगर परिसरातील सरस्वती शाळेजवळ वाहनांची तोडफोड करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी पहाटे 4:15 च्या सुमारास ह्या वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीत 8 ते 10 वाहनांच्या काचा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.