Pune : घोर कलीयुग! प्रमोशनसाठी हपपलेल्या नवऱ्याने बायकोला बॉससोबतच…पुण्यातून धक्कादायक घटना समोर
पुण्यामधून एक धक्कादायक आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला दुसऱ्या परपुरूषासोबत रात्र घालवण्यासाठी सांगितली.
पुणे : अग्नीला साक्षीदार मानून सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचं वचन देत पती आणि पत्नी आपल्या संसाराला सुरूवात करतात. कोणताही पती तिच्या पत्नीविषयी वाईट ऐकून घेत नाही कारण त्याच्यासाठी त्याची पत्नी अभिमान आणि सन्मान असते. समाजामध्ये स्त्री तिच्या पतीची अर्धांगिणी म्हणून वावरते. पती आणि पत्नीच्या नात हे शब्दात मांडता न येणारं आहे. मात्र अशातच पुण्यामधून एक धक्कादायक आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला दुसऱ्या परपुरूषासोबत रात्र घालवण्यासाठी सांगितली.
नेमकं काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रातील पुण्यातील ही घटना असून मूळच्या इंदूर इथल्या एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. लग्नानंतर तिचा पती वाईट संगतीत पडतो तेव्हापासूनच त्याने अनेकवेळा चुकीच्या गोष्टींसाठी तो तिच्यावर दबाव टाकायचा. महिलेने आपल्या पतीवर आरोप करताना, बॉससोबत एक रात्र घालवण्यासाठी दबाव टाकल्याचं सांगितलं. कारण त्याला प्रमोशन हवं होतं यासाठी तो आपल्याच पत्नीला बॉसच्या वासनेची शिकार बनवत होता. अमित छाबरा असं संबंधित पतीचं नाव आहे.
महिलेने तिच्या पतीच्या भावावरही आरोप केला आहे. दीर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा इतकंच नाहीतर तिच्या 12 वर्षांच्या मुलीसमोरही त्याने अनेकवेळा अश्लीलकृत्य केलं आहे. याविरूद्ध तिने आवाज उठवला तेव्हा तिलाच मारहाण करण्यात येत होती. तक्रार करणाऱ्या महिलेने कथितरित्या तिच्या हाताची नस कापण्याचाही प्रयत्न केला होता. 2022 मध्ये या अत्याचाराला कंटाळून ती माहेरी परतली होती.
तिच्यासोबत होणाऱ्या प्रकराबद्दल तिने माहेरच्यांना कोणतीच माहिती दिली नाही. मात्र जेव्हा हे डोक्यावरूनच जायला लागलं तेव्हा तिने घरी येत सर्व काही सांगितलं. पोलिसांनी पतीला बोलावूत घेत, त्रास देऊ नको अशी तंबी दिली. पोलिसांनी तसं त्याच्याकडून लेखीही लिहून घेतलं. मात्र काही दिवसानंतर सासरच्यांनी पुन्हा अत्याचार सुरू केला. त्यानंतर महिलेच्या पालकांनी इंदूरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने महिला कल्याण अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते, त्यानंतर पती, संसा आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.