धक्कादायक! पतीचा कोरोनाशी, पत्नीचा रुग्णालयातच नराधमाशी लढा; मानवतेला काळीमा फासणारा पाटण्यातील प्रकार

रुचीने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाला वाचा फोडतानाच रुग्णालयातील निष्काळजीपणाही चव्हाट्यावर आणला. (Husband fights with Corona, wife fights with harressment; The kind that defames humanity in Patna)

धक्कादायक! पतीचा कोरोनाशी, पत्नीचा रुग्णालयातच नराधमाशी लढा; मानवतेला काळीमा फासणारा पाटण्यातील प्रकार
पतीचा कोरोनाशी, पत्नीचा रुग्णालयातच नराधमाशी लढा
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 8:30 PM

पाटणा : कोरोना महामारीत अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली प्रचंड लुबाडणूक केली जात असल्याचे याआधी उघडकीस आले आहे. त्यात या संकटात नराधमांनीही अतिरेक केल्याचे उघडकीस येत आहे. पाटण्यातील रुग्णालयात तर मानवतेला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. कोरोनाग्रस्त पती आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्याच्या हतबल पत्नीचे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केले. पण मृत्यूच्या दाढेत असलेल्या पतीची साथ सोडता कामा नये म्हणून पत्नी रुग्णालयातच राहून नराधमाशी लढा देत राहिली. पतीच्या डोळ्यादेखतच तिचा विनयभंग होत होता. दुदैवाने पतीची कोरोनाशी सुरू असलेली झुंजही अपयशी ठरली व त्याचा मृत्यू झाला. ऐकून मन सुन्न करणारी ही कहाणी पीडित महिलेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून उजेडात आली आहे. (Husband fights with Corona, wife fights with harressment; The kind that defames humanity in Patna)

नेमकी काय घटना घडली?

मूळचे बिहारचे रहिवासी असलेले रोशन आणि रुचि हे दोघे नोएडामध्ये राहत होते. रोशन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तर मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होता. 9 एप्रिलला त्याला सर्दी ताप आला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. याचदरम्यान कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. परंतु नंतर फुफ्फुस्सात कोरोना संसर्ग झाल्याचे सिटी स्कॅनमधून कळले होते. त्यामुळे रुचीची काळजी वाढली होती. तिने रुग्णालयातच पतीसोबत राहायचे ठरवले.

याचदरम्यान ज्योती कुमार नावाच्या रुग्णालय कर्मचाऱ्याने रुचीचा पतीच्या डोळ्यादेखतच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पती रोशनला हे खटकले होते. मात्र आयसीयू बेडवर खिळून राहिलेला रोशन काहीच करू शकत नव्हता. रुचीने 26 दिवस पती रोशनसाठी रुग्णालयातील गैरव्यवस्थापनाशी लढत होती. ऑक्सिजनचाही बिनदिक्कतपणे काळाबाजार सुरू होता. त्यामुळे पतीसाठी रुचीने ज्यादा पैसे मोजून ऑक्सिजन सिलिंडर्स विकत घेतले. पण दुदैवाने तिला पतीचा प्राण वाचवता आला नाही.

रुग्णालयातील निष्काळजीपणा चव्हाट्यावर

रुचीने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाला वाचा फोडतानाच रुग्णालयातील निष्काळजीपणाही चव्हाट्यावर आणला. एकीकडे पतीची मृत्यूशी झुंज सुरू असताना जे घडत होते, ते अत्यंत संतापदायी होते, अशी प्रतिक्रिया रुचीने वृत्तवाहिनीला दिली. या वेळी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. रुग्णालयात पैशांसाठी लैंगिक शोषण करण्यात आले. कोरोना झाला तर त्यातून जीव वाचू शकतो परंतु रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे जीव जाणे निश्चित आहे, अशा शब्दांत रुचीने डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणावर नाराजी बोलून दाखवली. डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार न झाल्याने रोशनला मायागंज रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. तेथेही बिकट अवस्था होती.

एकामागोमाग एक रुग्ण मरत होते. एक व्यक्ती डॉक्टर डॉक्टर ओरडून खाली पडला आणि त्याचे डोके फुटले. सगळीकडे रक्त पसरले. पण डॉक्टर आणि नर्सना काहीही पडले नाही. ते त्यांच्या रुममध्ये मोबाईलवर पिक्चर बघत होते, असे आरोप रुचीने केले आहेत. तिची मोठी बहिण ऋचा सिंहनेही रुग्णालय व्यवस्थापनाचे वाभाडे काढले आहेत. माझ्या बहिणीकडे डॉक्टर आणि स्टाफ वाईट नजरेने पाहायचे. अनेकदा त्यांनी तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मायागंज हॉस्पिटलमधून एअर एम्ब्युलन्सने दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला परंतु एम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे पाटण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. रुची आणि रोशनचे 5 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळेच पती गमवावा लागल्याचे दु:ख रुचीने व्यक्त केले. (Husband fights with Corona, wife fights with harressment; The kind that defames humanity in Patna)

इतर बातम्या

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.