पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने 30 मित्रांना दिला तिचा मोबाईल नंबर, वाचा मग काय घडले ?
महिलेचा आरोप आहे की, 2021 मध्ये तिला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले, तडजोडीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण तडजोड न झाल्याने 2022 मध्ये आपण आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पीडितेने सांगितले.
उत्तर प्रदेश : पती-पत्नीमध्ये भांडणे ही एक सामान्य बाब आहे. प्रत्येक घरात नवरा-बायकोची भांडणे होत असतात. मात्र कानपूरमध्ये नवरा-बायकोच्या भांडणाबाबत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणावर त्याच्या पत्नीने हुंड्या (Dowry)साठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे संतपालेल्या पतीने पतीचा बदला घेण्यासाठी जो मार्ग निवडला ते ऐकून संताप आल्याशिवाय राहणार नाही. महिलेचा आरोप आहे की तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत तिच्या पतीने तिचा फोन नंबर (Phone Number) 30 मित्रांना दिला आणि त्यांच्यामार्फत अश्लील मॅसेज (Offensive Message) पाठवले. याबाबत मंगळवारी पीडितेने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून आयुक्तांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पती कामधंदा करत नसल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे
हे प्रकरण कानपूरमधील चकेरी भागातील आहे. आरोपी आकाशचे 2019 मध्ये श्याम नगर येथील महिलेशी लग्न झाले होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. आकाशच्या कुटुंबीयांनी खोटे बोलून लग्न केल्याचा पत्नीचा आरोप आहे. आकाशने काही कामधंदा करत नसल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले.
एक वर्षापूर्वी महिलेला मारहाण करुन घराबाहेर काढले
लग्नात पीडितेच्या आई-वडिलांनी 15 लाख रुपये खर्च केले होते. महिलेचा आरोप आहे की, 2021 मध्ये तिला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले, तडजोडीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण तडजोड न झाल्याने 2022 मध्ये आपण आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पीडितेने सांगितले.
संतापलेल्या पतीने पत्नीची बदनामी करण्यासाठी मित्रांना तिचा नंबर दिला
यानंतर आकाश इतका संतापला की पत्नीची बदनामी करण्यासाठी त्याने तिचा फोन नंबर आपल्या 30 मित्रांना दिला. यानंतर तिला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ येऊ लागले. महिलेचे म्हणणे आहे की, तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली पण पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे त्यांना आपली तक्रार घेऊन आयुक्तांकडे यावे लागले. महिला कक्षाच्या एसीपींना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.