लखनऊ : बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नोकराला एका महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. महिलेने चाकूने या नोकराच गुप्तांग कापून टाकलं व कापलेला भाग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे तिने काय प्रकार घडला. त्या बद्दल सांगितलं. या महिलेचा पती सौदी अरेबियात ड्रायव्हरच काम करतो. उत्तर प्रदेशच्या कौशंबाी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी घरात कोणी नाही ही संधी साधून या नोकराने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. किचन बंद करायचय सांगून कशीबशी महिला तिथून निसटली. येताना ती सोबत चाकू घेऊन आली. लैंगिक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकराच तिने गुप्तांगच कापून टाकलं.
त्यानंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली व तिने काय घडलं ते सांगितलं. पोलीस घरी आले, त्यावेळी त्यांना रक्ताने माखलेली बेडशीट मिळाली. त्यांनी वापरलेला चाकू जप्त केला. आरोपीची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल केलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांना दिलेल्या जबानीत या माणसाने वेगळी बाजू सांगितली. लहानपणापासून मी महिलेच्या घरात काम करतोय. घटनेच्या दिवशी महिलेने मला बोलावलं. मला बेशुद्धा केलं व माझ गुप्तांग कापलं, असं त्या मुलाने सांगितलं.
कोणाविरोधात गुन्हा नोंदवलाय?
मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कलम 326 आणि 308 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला नंतर ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांना आधी या मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवलं, तिथून प्रयागराज येथे उपचारासाठी दाखल केलं.