एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं… भाड्याने कुठं रहायला जायचं यावरून वाजलं, त्याने थेट पत्नीला संपवलं

संसार म्हटलं की तो काही फक्त सुखाचा नसतोच, भांड्याला भांड हे लागतंच. पती-पत्नीमध्ये होणारे हे वाद खूप कॉमन असतात. काही वेळा ती भांडणं लगेच मिटतात तर काहीवेळा रुसवे-फुगवे जरा जास्तच वाढतात. मात्र भांडणं वाढल्यावर रागावर ताबा राहिला नाही तर कधीकधी असं काही होऊन बसतं की एका क्षणात होत्याचं नव्हतं.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... भाड्याने कुठं रहायला जायचं यावरून वाजलं, त्याने थेट पत्नीला  संपवलं
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 11:25 AM

संसार म्हटलं की तो काही फक्त सुखाचा नसतोच, भांड्याला भांड हे लागतंच. पती-पत्नीमध्ये होणारे हे वाद खूप कॉमन असतात. काही वेळा ती भांडणं लगेच मिटतात तर काहीवेळा रुसवे-फुगवे जरा जास्तच वाढतात. मात्र भांडणं वाढल्यावर रागावर ताबा राहिला नाही तर कधीकधी असं काही होऊन बसतं की एका क्षणात होत्याचं नव्हतं अशी परिस्थिती उद्भवते. अशीच एक घटना सांगलीतही घडली आहे, ज्यामुळे अख्खं गावचं हादरलं. भाड्याने कुठे रहायला जायचं, या एवढ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाले, पण त्यानंतर पतीने जे केलं त्यामुळे त्यांचा अख्खा संसार आणि आयुष्यही उद्ध्वस्त झाला. भांडणानंतर पतीने बायकोच्या डोक्यात खोरे घालून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय 28) असे मृत महिलेचे नाव असून गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी ( वय 30) असे आरोपी पतीचे नाव आहे. सांगतलीतील विटा येथील पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांच्या सांगण्यांनुसार,सलमा आणि गुरापा हे दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते गेल्या काही काळापासून खानापूर नाक्याजवळ विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत रहात होते. हे दांपत्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा.

गेल्या आठवड्यात त्यांच्यात पुन्हा वाद झाला. भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे, या कारणावरून जोरदार रात्री जोरात वादावादी सुरू होती. या भांडणामुळे संतापलेल्या गुराप्पाने रागाच्या भरात घरात असणाऱ्या लोखंडी खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. त्यात तिच्या डोक्याला जबर जखम झाली आणि तिचं खूप रक्त वाहून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची तपासणी करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यानंतर संशयित पती गुराप्पाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.