वसई रेल्वे स्टेशनवर घडली अत्यंत धक्कादायक घटना! लोको पायलटला घाम फुटला; CCTV फुटेज पाहून सगळेच घाबरले

ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन रेल्वे स्थानकावर आला होता. पत्नी आणि दोन मुलांसह तो रेल्वे स्थानकातच थांबला होता. त्याची पत्नी झोपलेली असताना त्याने एक्सप्रेस ट्रेन येणार असल्याची अनाउन्समेंट ऐकली. यानंतर ट्रेन येताना त्याने पाहिले त्यानंतर त्याने पत्नीला झोपेतून उठवले. ट्रेन फलाटजवळ येताच या पतीने पत्नीला थेट ट्रेन खाली ढकलून दिले यानंतर तिची चप्पलही त्याने फेकून दिली.

वसई रेल्वे स्टेशनवर घडली अत्यंत धक्कादायक घटना! लोको पायलटला घाम फुटला; CCTV फुटेज पाहून सगळेच घाबरले
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 12:08 AM

मुंबई : वसई रेल्वे स्थानकात(Vasai railway station) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून रेल्वे स्थानकात काम करणारे कर्मचारी हडबडले आहेत. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला रेल्वेखाली ढकलून दिल्याचे थरारक दृश्य वसई रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पत्नी झोपलेली असताना तिला उठवून त्याने तिला थेट रुळावर फेकले. पतीने आपल्या पत्नीला ज्या ट्रेनखाली ढकलून दिले त्या ट्रेनच्या लोको पायलेट ने या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वसई रेल्वे स्थानकात हा थरारक प्रकार घडला आहे. एका अज्ञात पतीने आपल्या पत्नीला झोपेतून उठवून, तिला रेल्वेखाली ढकलून दिल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. पत्नीला रेल्वेखाली फेकल्यानंतर आरोपी पती आपल्या दोन मुलांना घेऊन फरार झाला. ही धक्कादायक घटना आज पहाटे 3 वाजून 58 मिनिटाला वसई रोड रेल्वे स्थानकात घडली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोको पायलट च्या जवाबा वरून वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी 2 पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत.

ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन रेल्वे स्थानकावर आला होता. पत्नी आणि दोन मुलांसह तो रेल्वे स्थानकातच थांबला होता. त्याची पत्नी झोपलेली असताना त्याने एक्सप्रेस ट्रेन येणार असल्याची अनाउन्समेंट ऐकली. यानंतर ट्रेन येताना त्याने पाहिले त्यानंतर त्याने पत्नीला झोपेतून उठवले. ट्रेन फलाटजवळ येताच या पतीने पत्नीला थेट ट्रेन खाली ढकलून दिले यानंतर तिची चप्पलही त्याने फेकून दिली.

पत्नीला धावत्या रेल्वेखाली ढकलून तिची हत्या केल्यानंतर नराधम पती दोन्ही मुलांना कडेवर घेऊन पळून गेला. हा व्यक्ती कोण आहे? त्याने पत्नीची अशी निर्घुणपणे हत्या का केली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.