Nanded : कुऱ्हाडीनं बायकोवर नवऱ्याचे सपासप वार! चारित्र्यांच्या संशयातून हत्या, किनवट हादरलं
Nanded Murder : Husband killed wife : किनवट पोलिसांनी संशयित आरोप आणि हत्यारा असलेल्या श्यामसुंदर घमेवाड यांला अटक केली आहे. चंद्रकलाचं वय 25 वर्ष होतं. श्यामसुंदरला तिच्यावर प्रचंड संशय होता.
नांदेड : पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीची पतीनच हत्या (Husband killed his wife) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क कुऱ्हाडीनं वार करत पत्नीचा जीव घेण्यात आला आहे. नांदेडमधून (Nanded Murder Case) या प्रकरणातील धक्कादायक बातमी समोर येते आहे. चक्क कुऱ्हाडीनं वार करत आपल्याच पत्नीची हत्या करण्यात आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरुन गेला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका इसमानं आपल्याच पत्नीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीचा मारेकरी असलेल्या पतीला अटकही केली आहे. सध्या पोलिस (Nanded Police) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे. नांदेड जिल्हा्यातील किनवट तालुक्यातील दुर्गम भागात ही खळबळजनक घटना घडली आहे.
कुऱ्हाडीनं सपासप वार!
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दुर्गभ भागातील पारडी खुर्द गाव हादरुन गेला आहे. हत्येच्या घटनेमुळे या गावातील सगळेच जण धास्तावलेत. एका पत्नीनं आपल्याच पत्नीची कुऱ्हाडीनं सपासप वार करुन हत्या केली.
श्यामसुंदर घमेवाड असं पतीचं नाव आहे. श्यामसुंदरची पत्नी चंद्रकलाची हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. श्यामसुंदरनं चंद्रकलावर कुऱ्हाडीनं सपासप वार केले. यातच चंद्रकलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंद्रकलाच्या वडिलांची आपल्या जावयाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे.
संशयातून हत्याकांड
किनवट पोलिसांनी संशयित आरोप आणि हत्यारा असलेल्या श्यामसुंदर घमेवाड यांला अटक केली आहे. चंद्रकलाचं वय 25 वर्ष होतं. श्यामसुंदरला तिच्यावर प्रचंड संशय होता. आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत त्यानं आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी किनवट पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत. एकूणच या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हारदलाय.
संबंधित बातम्या :
Live In Video: लिव्ह इनचं झिंगाट, रस्त्यावर गोंगाट, पोट्टं टाईट, पोरीसोबत भररस्त्यात फाईट