कपडे आणायला गेली ती परतलीच नाही; आई बिचारी कॉल करत होती पण.. अमरावतीत काय घडलं ?

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच आमरवातीमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ माजली

कपडे आणायला गेली ती परतलीच नाही; आई बिचारी कॉल करत होती पण.. अमरावतीत काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 12:30 PM

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच आमरवातीमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ माजली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या पतीनेच तिचा जीव घेतल्याचे उघड झाले असून खून केल्यानंतर तो फरार झाला. पतीशी वाजल्यानंतर माहेरी रहायला गेलेली विवाहीत हिला काही कपडे आणण्यासाठी परत सासरी गेली होती, मात्र तिथेच तिचा घात झाला. तिच्या पतीने खून करून पळ काढला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.

कपडे आणायला घरी गेली ती परतलीच नाही

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री लाडे असं मृत महिलेचं नाव आहे तर अक्षय असं आरोपीचं नाव असून सध्या तो फरार आहे. भाग्यश्री ही पती अक्षय सोबत अमरावतीच्या प्रभु कॉलनीत रहात होती. मात्र तिचा पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी रहायला आली होती. कपडे घेऊन येण्यासाठी ती तिच्या 1 जानेवारी रोजी सासरच्या घरी स्कूटीने गेली ोती पण परत आलीच नाही, तिचे आई-वडील कॉल करत होते, पण रात्र उलटूनही तिचा काही पत्ता लागला नाही, तिने कॉलही उचलला नाही. अखेर तिच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

सीसीटीव्हीमुळे लागला गुन्ह्याचा छडा

त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत तातडीने भाग्यश्रीचा फोन ट्रेस करण्यास सुरूवात केली असता तिची स्कूटी ही रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली, आणि त्यामध्येच तिचा फोनही होता. पोलिसांनी रेल्वेस्टेशन वरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तेव्हा भाग्यश्रीचा पती अक्षय हाच तिची स्कूटी रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचे त्यात दिसून आले. पोलिसांनी तातडीने प्रभू कॉलनी येथील त्यांचे घर गाठले असता, घराला कुलूप दिसले. मात्र पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास यांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री ही बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली सापडली. तिच्या हातापायावर आणि मानेवरही चाकूने वार केले होते.

पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करत तपास सुरू केला. भाग्यश्रीचा पती अक्षय यानेच घटनेच्यारात्री तिची हत्या केली, त्यानंतर तो तिचीच स्कूटी घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत गेला आणि तिथून फरार झाल्याचे तपासात समोर आली. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून कसून शोध घेण्यात येत आहे.

'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.