मुलांना शाळेत घ्यायला कुणीच गेले नाही, मुलांचा मामा घरी येऊन पाहतो तर पायाखालची जमीनच सरकली !

नेहमीप्रमाणे सकाळी मुलं शाळेत गेली. बापाने मुलांना शाळेत सोडले. शाळा सुटल्यानंतर मुलांना शाळेत घ्यायला कुणी गेलं नाही. यामुळे मुलांचा मामा बहिणीला पहायला घरी आला.

मुलांना शाळेत घ्यायला कुणीच गेले नाही, मुलांचा मामा घरी येऊन पाहतो तर पायाखालची जमीनच सरकली !
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 7:55 PM

पनवेल / रवी खरात : पनवेलमधील कामोठे भागात एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून निर्दयी पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढत कोल्हापूर येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. बिरप्पा शेजाळ असे आरोपी पतीचे नाव आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने शिताफीने तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. निर्दयी पित्यामुळे मुलांचे मायेचे छत्र कायम हरपले आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस अधिक तपास करत आहेत.

पत्नीसोबत सतत भांडण करायचा पती

बिरप्पाचे त्याच्या पत्नीशी सतत घरगुती कारणातून वाद होत होते. बिरप्पा हा पत्नीला घरखर्चाचेही पैसे देत नव्हता. पत्नीशी सतत भांडण करुन तिचा छळ करायचा. शनिवारी त्याने मुलांना नेहमीप्रमाणे शाळेत सोडले. मग घरी येऊन पत्नीची हत्या करुन पळून गेला. शाळा सुटल्यानंतर मुलांना घ्यायला कुणीही गेलं नाही. यामुळे महिलेच्या भावाने घरी जाऊन पाहिले असता दरवाजा बंद होता.

महिलेचा भाऊ घरी आला असता घटना उघड

भावाला काहीतरी चुकीचं घडले असल्याचा संशय आल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत गेला. आत जाताच समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बहिणी घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. भावाने कामोठे पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

आरोपी पतीला कोल्हापुरातून अटक

हत्या केल्यानंतर पती फरार होता. यामुळे पतीनेच हे कृत्य केल्याचे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक माहितीवरुन आरोपी कोल्हापूरला लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला कोल्हापुरहून अटक केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.