चारित्र्यावरील संशयातून पतीचे पत्नीसोबत हैवानी कृत्य, आधी शरीरावर सुई टोचून वेदना दिल्या मग…

फगनूला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीसोबत हे हैवानी कृत्य केले. काल रात्री फगनू घरी आला आणि पत्नीला बळजबरीने रुममध्ये घेऊन गेला.

चारित्र्यावरील संशयातून पतीचे पत्नीसोबत हैवानी कृत्य, आधी शरीरावर सुई टोचून वेदना दिल्या मग...
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 9:33 PM

बालोद : चारित्र्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीला सुई टोचून वेदना देत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बालोद येथे उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पतीलाही अटक केली आहे. फगनू राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजारी चौकी परिसरातील खेरथा बाजार गावात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवले

फगनूला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीसोबत हे हैवानी कृत्य केले. काल रात्री फगनू घरी आला आणि पत्नीला बळजबरीने रुममध्ये घेऊन गेला. यावेळी घरच्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने रुमचा दरवाजा आतून बंद केला.

हत्या करण्याआधी भयंकर यातना दिल्या

यानंतर फगनूने दाभण घेत पत्नीच्या कान, गळा, पोट आणि प्रायव्हेट पार्टवर टोचून तिला असह्य वेदना दिल्या. पत्नी वेदनेने विव्हळत होती पण नराधम पतीला तिची दया आली नाही. मरणयातना दिल्यानंतर त्याने पत्नीची गळा आवळून तिची हत्या केली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून आरोपीला अटक

यानंतर घरच्या लोकांनी आरोपी पतीला एका रुममध्ये बंद केले. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर घरचे लोक आणि अन्य लोकांच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.