Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बायकोला संपवलं, मग 3 मुलांसह स्वतःच पोलीस स्टेशनात हजर! हसत्या खेळत्या परिवारात काय घडलं?

जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील अमरावती येथे कौटुंबिक वादातून एका महिलेची तिच्या पतीने हत्या (Wife murder) केली. या धक्कादायक प्रकाराने सध्या अमरावती (Amravati Crime) हादरून गेलं आहे.

आधी बायकोला संपवलं, मग 3 मुलांसह स्वतःच पोलीस स्टेशनात हजर! हसत्या खेळत्या परिवारात काय घडलं?
विवाहितेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:52 PM

अमरावती : कालच आपण जागतिक महिला दिन (Womens day) साजरा केला. आपल्या आजुबाजुला असणाऱ्या, आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, आपल्या पाठिशी खंभीरपणे उभे राहणाऱ्या महिलांना शुभेच्छा दिल्या. मात्र याच महिला दिनी अमरावतीत एका महिलेबरोबर अतिशय धक्कादायक्र प्रकार घडला आहे. कारण जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील अमरावती येथे कौटुंबिक वादातून एका महिलेची तिच्या पतीने हत्या (Wife murder) केली. या धक्कादायक प्रकाराने सध्या अमरावती (Amravati Crime) हादरून गेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथे कौटुंबिक वादातून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उदध्वस्त झालंय.

कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

हे प्रकरण महाराष्ट्रातील अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील दस्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे स्वागत वाढल्याची चर्चा होती, तर दुसरीकडे शहरात पती-पत्नीच्या वादातून पतीने महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. कौटुंबिक वादातून महिलेची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर मयतेच्या पतीने आपल्या तीन निष्पाप मुलांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली आणि खुनाची कबुली दिली. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या हत्येमागे कौटुंबिक वाद आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती दिनेश खेडकर याला अटक करण्यात आली आहे.

क्षणभराचा राग नडला

दर दिवशी अशा अनेक घटना समोर येत आहेत. कौटुंबीक वाद आणि राग अनावर झाल्याने असे प्रकार घडत आहेत. घडीभरचा राग आणि भीकमाग अशी म्हण आपण सुरूवातीपासूनच ऐकत आलोय. हा घडीभरचा राग किती महागात पडू शकतं ते या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. मुलाबाळांनी भरलेलं हे हसतं खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्धवस्त झालंय. शिवाय आईच्या हत्येनंतर आता वडिल जेलमध्ये गेल्याने मुलं दोन्ही नात्यांना पोरकी झाली आहेत. ती व्यथा निराळीच आहे. त्यामुळे अशा घटना आणि भांडणं टाळता येतील, तेवढी टाळा.

Video : राजकीय वाद बुद्धी करी बाद, भांडणाचा राग धरून चक्क ढाबा पेटवला

डबल मर्डरने सांगली हादरलं, दोन गट आपसात भिडले, दोघांचे मुडदे पडले

घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.