Kolhapur Woman Death : मुलाच्या हव्यासापोटी पत्नीला संपवले, मग अपघाती मृत्यूचा केला बनाव

दोनवडे येथील एकनाथ पाटील आणि पत्नी अश्विनी या दाम्पत्याला दोन मुली आहेत. असे असतानाही मुलगा हवा यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता.

Kolhapur Woman Death : मुलाच्या हव्यासापोटी पत्नीला संपवले, मग अपघाती मृत्यूचा केला बनाव
वंशाच्या दिव्यासाठी पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 6:07 PM

कोल्हापूर : दोन मुलीच झाल्याने संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना करवीर तालुक्यातील दोनवडे येथे घडली आहे. अश्विनी एकनाथ पाटील असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. एकनाथ पाटील असे आरोपी पतीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पत्नीची हत्या करुन वीजेचा शॉक लागल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी हत्येचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीने पत्नीची हत्या नेमकी कशी केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

मुलगा हवा म्हणून पती-पत्नीत होते वाद

दोनवडे येथील एकनाथ पाटील आणि पत्नी अश्विनी या दाम्पत्याला दोन मुली आहेत. असे असतानाही मुलगा हवा यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता. याच वादातून पती एकनाथकडून हा अश्विनीचा शारीरिक, मानसिक छळ ही केला जात होता.

वादातून पतीने हत्या केली

नेहमीप्रमाणे आज पहाटे देखील वंशाच्या दिव्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून एकनाथ पाटील याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

पत्नीची हत्या करुन अपघाती मृत्यूचा बनाव

पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी शॉक लागल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा पतीने बनाव केला. मात्र दक्ष नागरिकांमुळे त्याचा हा बनाव उघड झाला. गावातील नागरिकांनी एकनाथला चोप दिल्याने त्याने हत्येची कबुली दिली.

हत्याकांडात सासू-सासऱ्यांचाही समावेश

महिलेच्या हत्येत पतीसह सासू, सासऱ्याचाही सहभाग असल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी एकनाथला त्यांनी ताब्यात घेतलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.