पतीने तिचा मोबाईल हातातून खेचला आणि तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, पतीला गुवाहटीमधून अटक
घटनेच्या दिवशी शिजान आणि क्रषिका यांचे जोरदार भांडण झाले, क्रषिका हीचा फोन तपासून पाहताना काही मॅसेज डीलीट केलेले आढळले. त्यावरुन त्याने तिला जाब विचारला. घाबरलेल्या क्रिषिका हीने सरळ शेजारील टॉवरवरून उडी मारली.
मुंबई : क्रिषिका आपल्याला फसवत असल्याचा शिजान याला संशय होता. त्याने तिचा मोबाईल ( MOBILE ) खेचत तिचे व्हॉट्सअपचे सर्व मॅसेज तपासले, काही मॅसेज तिने डीलीट ( DELETE ) केल्याचे त्याला आढळले. त्यावरून शिजान अधिकच संतापला आणि त्याने तिला डीलीट केलेले मॅसेज पुन्हा मिळवता येतात अशी धमकी देत तो तिचा मोबाईल घेऊन घराबाहेर पडला आणि त्यामुळे घाबरलेल्या क्रिषिकाने थेट इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून स्वत: ला संपविले. या प्रकरणात पतीला पत्नीस आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याप्रकरणी बांगूर पोलीसांनी गुवाहाटीतून पतीला अटक केली आहे.
क्रिषीका थापा ( वय 30 ) या मालाडला ब्युटीशीयन म्हणून काम करतात. गोरेगाव पश्चिमकडील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केल्याने तिची पती शिजान याला मंगळवारी गुवाहाटीतून बांगूर नगर पोलीसांनी अटक केली. गोरेगाव पश्चिमेकडील लक्ष्मी नगरातील गुलजार इमारती जवळ भाड्याने रहाणाऱ्या शिजान आणि त्याची पत्नी क्रीशिका यांच्यात जोरदार भांडण झाले.
क्रिषिका आपल्याला फसवत असल्याचा शिजान याला संशय होता. त्याने तिचा मोबाईल तिच्याकडून घेत डिलीट केलेले मॅसेज रिक्रीट करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या क्रिषिका हीने त्यांच्या शेजारील टॉवरच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर घाबरलेला शिजान गुवाहटीत पळून गेला. पोलीसांनी त्याला शोधून आणत मंगळवारी अटक केली.
25 जानेवारीला गोरेगावच्या गुलजार टॉवरवरून खाली पडलेला महिलेचा मृतदेह सापडला असल्याचा कॉल बांगूरनगर पोलीसांना आला. चौकशीत या टॉवरमध्ये कोणी ओळखत नसल्याचे पोलीसांना समजले.
घटनेच्या दिवशी शिजान आणि क्रिषिका यांचे जोरदार भांडण झाले. त्यावेळी क्रिषिका हीचा फोन तपासून पाहताना काही मॅसेज डीलीट केलेले आढळले. त्यावरुन त्याने तिला जाब विचारला. त्यानंतर त्याने हे मॅसेज पुन्हा मिळविण्याची तिला धमकी दिली. आणि तिचा मोबाईल फोन घेऊन शिजान तावातावाने घराबाहेर पडला. त्यामुळे घाबरलेल्या क्रिषिका हीने सरळ शेजारील टॉवर जाऊन सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेनंतर शिजान गुवाहटीला पळून गेला, बांगूर नगर पोलीसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीवर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.