पतीचा खोडसाळपणा नडला! पत्नीचे रात्रीचे ते क्षण झाले रेकॉर्ड… ऐकून पोलिसांनाही फुटला घाम
एक अतिशय विचित्र बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या खोलीत कॅमेरे बसवून असे क्षण रेकॉर्ड केले की अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. बायको तर बायको पण पतीचीही कमाल. एका रेल्वे कर्मचाऱ्याने स्वतःच्या खोलीत छुपे कॅमेरे लावले. रात्रंदिवस त्याने पत्नी काय करते, तिच्या प्रत्येक हालचालींचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. घरातील छुप्या कॅमेराविषयी पत्नीला माहिती देखील नव्हते. व्हिडीओ रेकॉर्ड करुन पती पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने छुप्या कॅमेरातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पोलिसांना दाखवले ते पाहून सर्वांनाच घाम फुटला.
२ वर्षांपूर्वी केले लग्न
३० वर्षीय लोकेश मांझी हा रेल्वे विभागात लोको पायलट म्हणून काम करत होता. हर्षिता रायकवार नावाच्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. लग्नानंतर हर्षिता, तिची आई आणि भाऊ लोकेशकडे पैसे, चांदी-सोन्याच्या दागिण्यांची मागणी करत होते. लग्न झाल्यापासून हर्षिताने लोकेशला त्याच्या आई-वडिलांना, कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला भेटू दिले नव्हते.
वाचा: ‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…
पुरावे घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात
आता रेल्वे कर्मचारी पत्नीच्या क्रूरतेचा पुरावा घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता. तो पोलिसांना म्हणाला, ‘मला माझ्या बायकोपासून वाचवा. पहा हा व्हिडिओ, ती मला कशी मारहाण करते.’ पीडित तरुणाने ही मारहाणीची घटना छुप्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली होती. पन्ना जिल्ह्यातील अजयगड तालुक्यातील लोकेश कुमार मांझी सध्या सतना येथे राहतो. तो म्हणतो, मी एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न केले. लग्नात मी हुंडा घेतला नाही. मुलीचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात. लग्न झाल्यापासून माझी पत्नी मला माझ्या आई-वडिलांशी बोलू देत नाही आणि माझ्या घरी कोणाला येऊ देत नाही. मला माझ्या मित्रांनाही भेटू देत नाही. तसेच घरातील कामामध्ये मदतही करत नाही.
रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नी सतत शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे देखील नमूद केले. एके दिवशी मी गुपचूपपणे घरात कॅमेरे बसवले होते. त्यानंतर मी आमच्या खोलीत देखील बसवला. सुरुवातीला मी वेगळ्या उद्देशाने हे कॅमेरे लावले होते. मात्र, या कॅमेरामध्ये माझ्यासोबत ती जे काही कृत्य करत आहे ते रेकॉर्ड झाले आहे. माझ्याशी भांडण झाल्यावर पत्नीने आई आणि भावाला सतना येथे बोलावून घेतले. त्यांनी सगळ्यांनी मला मारहाण केली. यामुळे मी जखमी झालो. याप्रकरणी सतना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पीडितेने सांगितले की, पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार केल्याचे समजताच मला धमकी देण्याचा प्रयत्न केला. तिने आत्महत्या करण्याची आणि मुलीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. यासह मी तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात पाठवणार आहे असे म्हटले. इतकंच नाही तर माझ्या पत्नीने एकदा डास मारण्याचे औषध देखील प्यायले. मला खूप भीती वाटते. अजयगड पोलिस ठाण्यात अर्जही दिला आहे, मात्र कारवाई झाली नाही.