Thane Crime : अचानक घरातून गोळीबाराचा आवाज आला, नातेवाईक पहायला गेले तर पायाखालची जमीनच सरकली !
घरातून अचानक गोळीचा आवाज आल्याने शेजाऱ्यांसह नातेवाईक धावत आले. घरी जाताच समोरील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. य घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली.
ठाणे / 2 सप्टेंबर 2023 : ठाण्यात गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गोळी झाडून हत्या केल्याची घटना कळवा येथे उघडकीस आली आहे. पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. प्रमिला साळवी आणि दिलीप साळवी अशी मयत जोडप्यांची नावे आहेत. गोळीचा आवाज ऐकून शेजारी आणि नातेवाईक धावत आले. त्यानंतर घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी कळवा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात कळवा पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि पोलीस उपायुक्त गणेश गावडे घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
घरगुती वादातून घडली घटना
कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवास येथे साळवी कुटुंब राहते. दिलीप हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आणि ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू आहेत. शुक्रवारी पती-पत्नीमध्ये काही कारणातून वाद झाला. हा विकोपाला गेला आणि दिलीप यांनी पत्नी प्रमिला हिच्यावर गोळी झाडली. यानंतर दिलीप यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
गोळी आवाज ऐकून शेजारी धावले
गोळी झाडल्याचा आवाज ऐकून शेजारी आणि नातेवाईक साळवी यांच्या घरी धावले. घरामध्ये प्रमिला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्य होत्या. तर दिलीप यांचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवले. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. दिलीप यांनी पत्नीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली का असाही सवाल उपस्थित होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पतीच्या हत्येच्या कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.