बहिणीच्या घरी चल म्हणून मागे लागला, पत्नीने नकार देताच थेट ॲसिड..

राग.. माणसाचा महाभयानक शत्रू... डोक्यात राग घुसलेला माणूस कधी काय करून बसेल याची शाश्वती नाही. त्या रागाच्या भरात तो असं एखादं कृत्य करतो की त्यामुळे क्षणात सगळं विस्कटू शकतं. समोरच्याला तर त्रास होतोच पण रागात ती कृती करणाऱ्याचं आयुष्यही बरबाद होऊ शकतं.

बहिणीच्या घरी चल म्हणून मागे लागला, पत्नीने नकार देताच थेट ॲसिड..
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 12:22 PM

पनवेल | 12 फेब्रुवारी 2024 : राग.. माणसाचा महाभयानक शत्रू… डोक्यात राग घुसलेला माणूस कधी काय करून बसेल याची शाश्वती नाही. त्या रागाच्या भरात तो असं एखादं कृत्य करतो की त्यामुळे क्षणात सगळं विस्कटू शकतं. समोरच्याला तर त्रास होतोच पण रागात ती कृती करणाऱ्याचं आयुष्यही बरबाद होऊ शकतं. अशाच रागामुळे भयानक परिस्थिती उद्भवून संसाराची राखरांगोळी झाल्याची धक्कादायक घटना पनवेल येथे घडली. एका क्षुल्लक गोष्टीमुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला, बघता -बघता तो वाद टोकाला गेला की पती संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने स्वत:च्याच पत्नीवर ॲसिड हल्ला केला.

नवऱ्याच्या बहिणीकडे जायला नकार दिला म्हणून फेकलं ॲसिड

हो , हे खरं आहे. पनवेलमधील खैरणे गावात ही दुर्दैवी घटना घडली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमजान सिद्दीकी असे आरोपीचे नाव असून अमीना असे पीडित पत्नीचे नाव आहे. 20 जानेवारी रोजी रमजाने याने पत्नीवर ॲसिड फेकले. रमजान याला त्याच्या बहिणीच्या घरी हैदराबादल जायचं होतं, आपल्यासोबत चल असं तो पत्नीलाही सांगतं होता. मात्र त्याची पत्नी काही सोबत येण्यास तयार नव्हती.

याच मुद्यावरून त्यांचं भांडण झालं आणि हळूहळू ते इतक वाढलं की वाद विकोपाला गेला. त्या भांडणामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीच्या चेहऱ्यावरती ॲसिड टाकलं. यामुळे ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पत्नी अमिना तातडीने पश्चिम बंगाल येथे निघून गेली. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तेथे जाऊन तिने पतीविरोधात बनियापुकुर येथे तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी गुन्हा दाख केला. त्यानंतर पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये देखील तक्रार प्राप्त झाली. पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.