नवरा म्हणाला, ‘वांग्याची भाजी दे’, बायको म्हणाली, ‘संपलीय’, चिडलेल्या नवऱ्याने रॉकेल टाकून पत्नीला पेटवलं

वांग्याच्या भाजीसाठी पतीने पत्नीला रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या हेर इथं घडली आहे. (husband threw kerosene and set his wife on fire in Latur Udgir) 

नवरा म्हणाला, 'वांग्याची भाजी दे', बायको म्हणाली, 'संपलीय', चिडलेल्या नवऱ्याने रॉकेल टाकून पत्नीला पेटवलं
वांग्याच्या भाजीसाठी पतीने पत्नीला रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या हेर इथं घडली आहे.
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 11:22 AM

लातूर : वांग्याच्या भाजीसाठी पतीने पत्नीला रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या हेर इथं घडली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यातील हजार-दीड हजार लोकसंख्येचं हेर हे गावं… या लहानश्या गावातील घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा हादरला आहे. (husband threw kerosene and set his wife on fire in Latur Udgir)

मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीकडे जेवायला वांग्याची भाजी देण्याचा आग्रह केला. पत्नीने भाजी संपली आहे असं सांगताच पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ज्यामध्ये पत्नी फर्जाना शेख ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.

सकाळी फर्जाना हिने वांग्याची भाजी केली होती, मात्र शादूल वाद करून जेवण न करताच निघून गेला होता. रात्री येऊन त्याने वांग्याचीच भाजी देण्याचा आग्रह धरला. भाजी संपलीय असे सांगताच त्याने फर्जानावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे.

अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांच्यावर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी पती शादूल शेख याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

(husband threw kerosene and set his wife on fire in Latur Udgir)

लातुरात 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

लातूरच्या एका खाजगी कॉलेजात शिकणाऱ्या एका युवतीने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या. गळफास घेऊन स्वतःला संपवण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत व्हिडीओ पोस्ट करुन सोनू शेख हिने आत्महत्या केलीय.

लातूर शहरातल्या कॉलेजात बी.ए. च्या व्दितीय वर्षात शिकणारी सोनू शेख… सोनू शेख ही कॉलेज करत करत पार्ट टाइम जॉब देखील करायची… आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये, असा व्हिडीओ पोस्ट करत सोनूने राहत्या घरी आत्महत्या केलीय.

व्हिडीओत काय म्हणतीय सोनू शेख?

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त दिवस टिकू शकत नाही… माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल. आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये…”, असं सोनूने आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

हे ही वाचा :

ह्रदयद्रावक Video, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत, ‘लातूर पॅटर्न’ तरुणीची आत्महत्या 

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.