सोशल मीडियाचा शौक महागात पडला! पत्नीच्या रीलवर अश्लील कमेंट यायच्या, त्रस्त पतीने थेट आयुष्य संपवलं
सध्या सोशल मीडियाचा वापर खूव वाढला आहे. अनेक जण इन्स्टाग्राम, फेसबूक इत्यादींवर रील्स बनवून अपलोड करत असतात. मात्र याच रील्सच्या नादापायी एका माणसाचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला आणि पतीने टोकाचं पाऊलचं उचललं. पत्नीच्या रील बनवण्याच्या नादाने त्रस्त झालेल्या एका पतीने आत्महत्या केली.
सध्या सोशल मीडियाचा वापर खूव वाढला आहे. अनेक जण इन्स्टाग्राम, फेसबूक इत्यादींवर रील्स बनवून अपलोड करत असतात. मात्र याच रील्सच्या नादापायी एका माणसाचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला आणि पतीने टोकाचं पाऊलचं उचललं. पत्नीच्या रील बनवण्याच्या नादाने त्रस्त झालेल्या एका पतीने आत्महत्या केली. राजस्थानच्या अलवारमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.
पतीने त्याच्या पत्नीला अनेकदा रील्स बनवण्यापासून रोखले होते मात्र तिने त्याचं काहीच ऐकलं नाही. यामुळेच नाराज झालेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. दोघांमध्ये रील्सच्या मुद्यावरून सारखे वाद व्हायचे. घटनेपूर्वीही त्यांच्यात असंच भांडण झालं आणि पत्नी माहेरी निघून गेली. ज्यामुळे त्रस्त झालेल्या पतीने आयुष्य संपवलं. मात्र मरण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर लाइव्ह येऊन अश्लील कमेंट करणाऱ्या लोकांना खडे बोल सुनावले.
सोशल मीडियाचा शौक महागात पडला
सिद्धार्थ दौसा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो सरकारी कर्मचारी होता. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी माया हे दोघे रैनी परिसरातील नांगलबास गावात राहत होते. सिद्धार्थ हा आरोग्य विभागात एलडीसी (अवर श्रेणी लिपिक) पदावर कार्यरत होता. दीड वर्षापूर्वी त्याला वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. त्यांनी तीन मुली आणि एक मुलगाही आहे. 5 एप्रिल रोजी सिद्धार्थने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या पत्नीला माया हिला रील्स बनवण्याची खूप आवड होती. ती विविध रील्स बनवून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर शेअर करायची. मात्र बरेच लोक त्यावर अश्लील कमेंट करायचे. सिद्धार्थला मात्र त्याच्या पत्नीचे असे रील्स बनवणे खटकत होते. त्याने तिला रील बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुद्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. घटनेच्या आधीही त्या दोघांमध्ये भांडण झालं. तो वाद इतका विकोपाला गेला की, सिद्धार्थची पत्नी, माया ही माहेरी निघून गेली.
यामुळे संतापलेल्या सिद्धार्थने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वी तो ऑनलाइन आला. लाइव्ह येत सिद्धार्थने अश्लिल कमेंट्स करणाऱ्यांना खडेबोल सुनावेल. ‘अशी परिस्थिती जेव्हा तुमच्या घरात येईल, तेव्हाच तुम्हाला समजेल. मी माझे कुटुंब तुटू देणार नाही. म्हणूनच मी माझा जीव देत आहे’असे त्याने नमूद केले. त्यानंतर त्याने आयुष्य संपवलं. सिद्धार्थ दौस याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.