दोन वर्षांपासून गायब पतीचा अचानक फोन, पत्नी भेटायला गेली पण…

दोन वर्षांपासून गायब असलेल्या पतीने एक दिवस अचानक त्याच्या पत्नीला फोन केला. त्याचा आवाज ऐकून पत्नीला खूप आनंद झाला. पतीने तिला भेटण्यासाठी बोलावलं, त्याने दिलेल्या पत्त्यावर पत्नी भेटायला गेली पण

दोन वर्षांपासून गायब पतीचा अचानक फोन, पत्नी भेटायला गेली पण...
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 10:23 AM

उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये एक अशी घटना घडली आहें, ज्यामुळे लोकांचा नात्यावरचा विश्वासच उडू शकतो. दोन वर्षांपासून गायब असलेल्या पतीने एक दिवस अचानक त्याच्या पत्नीला फोन केला. त्याचा आवाज ऐकून पत्नीला खूप आनंद झाला. पतीने तिला भेटण्यासाठी बोलावलं, त्याने दिलेल्या पत्त्यावर पत्नी भेटायला गेली पण समोरचं दृश्य पाहून ती अवाक् झाली. तिथे तिचा पती एका दुसऱ्या महिलेसोबत होता, तिने त्या महिलेबद्दल पतीकडे विचारणा केली असता त्याचं उत्तर ऐकून तिला मोठा धक्का बसला. ती आपली गर्लफ्रेंड असल्याचं पतीने सांगितलं. मात्र तो एवढ्यावरंच थांबला नाही तर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मिळून त्याच्याच बायकोला बेदम मारहाण केली.

त्या नराधम पतीने लोखंडी रॉडने त्याच्या बायकोला एवढा बेदम चोप दिला की तिचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. एकूण सात जणांनी मिळून तिला मारहाण केली. शेजारच्या लोकांनी त्या महिलेचा आक्रोश ऐकला आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आणि त्यांनी त्या महिलेची आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. अखेर त्या महिलेने थेट पोलीस ठाण्यातच धाव घेतली. तेथे तिने तिचा पती, त्याची गर्लफ्रेंडसह 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा चोपण पोलीस स्टेशन हद्दीतील डाळा येथे ऑर्केस्ट्रा डान्सरच्या प्रेमात पडला, त्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला भेटायला बोलावलं. त्यानंतर पती आणि त्याच्या प्रेयसीच्या डान्सरच्या कुटुंबीयांनी मिळून पत्नीला मारहाण केली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्या इसमाची प्रेयसी आणि तिच्या कुटुंबातील सात ते आठ जणांनी त्या महिलेला चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी कसा तरी हस्तक्षेप करत त्या महिलेला वाचवले.

चेहऱ्यावर चाकूने वार

पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुकूट येथे राहणाऱ्या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली, तिच्या सांगण्यानुसार, तिचे पती ऑर्केस्ट्रा चालवतात. मला त्याची माहिती नव्हती. त्याचे एका महिला डान्सरसोबत अफेअर असल्याबद्दलही मला काहीच माहीत नव्हतं. दोन वर्षांपूर्वी नवरा अचानक घर सोडून गेला. त्यानंतर अचानक रविवारी त्याने मला फोन केला आणि डळा येथील घरी भेटायला बोलावले. मी तिथे पोहोचले पण तेव्हा तिकडे एकूण 7 जण होते. त्यानंतर माझा पती आणि त्याच्या मैत्रिणीसह 7 जणांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच माझ्या चेहऱ्यावर चाकूने वार केले, असा आरोप महिलेने केला.

माझ्या पतीने माझ्या नावावर 6 लाखांचे कर्ज घेतले आहे. त्याने ते कर्ज चुकवावं एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी मला त्याच्याशी काहीच संबंध ठेवायचा नाहीये, तो त्याला पाहिजे त्या व्यक्तीसोबत कुठेही राहू शकतो. पण मला जी मारहाण करण्यात आली, त्याबद्दल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणी तिने केली.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.