मला तुझ्या भावापासून सुंदर मुलगा हवाय… दिरासोबत पळाली; नवऱ्याने जे केलं त्याने…

मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला चक्क नवऱ्याला सोडून पळून गेली आहे. विशेष म्हणजे ती दिरासोबत पळून गेले आहे. तिचं पळून जाण्याचं कारण अत्यंत वेगळं आहे. हे कारण ऐकल्यावर महिलेच्या घरच्यांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे. एखादी व्यक्ती असं कसं करू शकते? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

मला तुझ्या भावापासून सुंदर मुलगा हवाय... दिरासोबत पळाली; नवऱ्याने जे केलं त्याने...
एक महिला चक्क नवऱ्याला सोडून पळून गेली
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 3:03 PM

प्रेमात लोक वेडे होतात असं ऐकलं होतं. पण ठार वेडे होतात हे फार कमी वेळा पाहायला मिळालं आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर येथील एक महिला दिराच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेली. त्यामुळे नवरा अस्वस्थ झाला. कारणही तसंच होतं. पत्नीला सुंदर आणि गोरा मुलगा हवा होता. मला तुझ्या भावापासून सुंदर मुलगा हवाय, असं तिने नवऱ्याला सांगितलं आणि दिराला घेऊन घरातून पलायन केलं. त्यानंतर नवऱ्याने थेट पोलिसात जाऊन तक्रार केली. बायको पळून गेली याचं नवऱ्याला दु:ख नाहीये. तर बायको विष घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, याची भीती असल्याने त्याने पोलिसात तक्रार केली आहे. बायको आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्हाला तिच्यापासून वाचवा, असा टाहोच त्यांनी पोलिसांकडे फोडला आहे.

लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर ही महिला पळून गेली आहे. तिला गेल्या दहा वर्षापासून मुल होत नव्हतं. त्यामुळे तिने दिरासोबत पळून जाण्याचा निर्णय गेतला. मला सुंदर मुलगा हवा होता. माझा नवरा सुंदर नाहीये. माझा दीर नवऱ्यापेक्षा अधिकच सुंदर आहे. त्यामुळे दिरापासून मुल व्हावं असं मला वाटत होतं. त्यामुळे दिराकडे आकर्षित झाले. आमचे संबंधही झाले आहेत, असं या महिलेने म्हटलं आहे. हा प्रकार करण्यापासून नवऱ्याने रोखल्यानेच आपण पळून गेल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. या घटनेनंतर आता संपूर्ण कुटुंबच एसपी ऑफिसात न्यायाची मागणी करत आहे.

जीव देण्याची धमकी

छतरपूर येथील सीताराम कॉलोनीत राजेंद्र कुशवाहा राहतो. त्याने आता पोलिसात धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे. दहा वर्षापूर्वी त्याचं लग्न मीना कुशवाहाशी झालं. मीना त्याच्या लहान भावासोबत पळून गेली आहे. तसेच मेसेज करून नवऱ्याला धमकावत आहेत. त्यामुळेच राजेंद्र पोलीस ठाण्यात आलाय. बायकोने एक तर माझ्या भावाला फसवून पलायन केलं आहे. वरून आम्हाला धमकावतही आहे. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याला आम्ही जबाबदार राहू, असं तिचं म्हणणं आहे. तिला जिकडे जायचं तिकडं जावं. ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत राहावं. मला त्याचं काही घेणंदेणं नाही. फक्त तिने आम्हाला त्रास देऊ नये. आमची झाली तेवढी बदनामी पुरे झाली, असं राजेंद्र म्हणाला.

जादूटोणाही केला

मी नेहमी त्रस्त असायचो. त्यामुळे घरात सर्व काही व्यवस्थित चालावं म्हणून मी जादूटोणाही केला. तंत्र, मंत्र देवता वगैरे केलं. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. एका बाबाकडे गेलो तर तो म्हणाला तुम्ही सर्वजण अपवित्र झाला आहात. दोघांनीही गंगेत जाऊन अंघोळ करावी, तुम्हाला मुलगा होईल. तो सुंदर असेल. सर्व काही ठिक होईल. माझ्या बायकोला मी ही गोष्ट सांगितली. गंगेत स्नान करायला जाऊ म्हणून सांगितलं. पण बायकोने ऐकलं नाही. मुल नकोय आणि गंगेत स्नानही करायचं नाही, असं ती म्हणाल्याचा दावा राजेंद्रने केलाय.

चौकशी सुरू आहे

मला तुझ्यापासून मुक्तता हवी आहे. मला माझ्या प्रेमाकडून म्हणजे दिराकडून मूल हवं आहे. त्याच्यावर मी प्रेम करतेय. मला त्याच्यापासूनच मुल हवं आहे. तो दिसायला सुंदर आहे. मला त्याच्याकडूनच सुंदर मूल हवं आहे, असं मीनाने राजेंद्रला सांगितलं होतं. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस इन्स्पेक्टर विक्रम सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजेंद्रने मीना हरवल्याची तक्रार दिली आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी सुरू केली आहे, असं विक्रम सिंह म्हणाले.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.