तो पत्नीवर भडकला, कपाट उघडलं, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण…

पती-पत्नीमध्ये वाद होणं ही क्षुल्लक गोष्ट आहे. एकाच घरात राहून भांड्याला भांडं लागतं. त्यात गैर असं काहीच नाही. पण सांगलीतील एका इसमाने पत्नीवर चिडून जे कृत्य केलं त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.

तो पत्नीवर भडकला, कपाट उघडलं, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण...
तो पत्नीवर भडकला, कपाट उघडली, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण...
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 6:38 PM

सांगली : पती-पत्नीमध्ये वाद होणं ही क्षुल्लक गोष्ट आहे. एकाच घरात राहून भांड्याला भांडं लागतं. त्यात गैर असं काहीच नाही. पण सांगलीतील एका इसमाने पत्नीवर चिडून जे कृत्य केलं त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याचं झालं असं की कुपवाड येथील अकुज ड्रिमलँडमध्ये राहणाऱ्या कविता पवार यांचा चिरंजीव आदित्य नुकताच दहावी पास झालाय. आता त्याच्या अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. आदित्यच्या आईने पती तानाजी पवार यांच्याकडे मुलाच्या अकरावीच्या प्रवेशासाठी पैसे लागतील म्हणून पैसे मागितले. पण याच गोष्टीचा पतीला राग आला.

पत्नीच्या डोक्यावर बंदूक रोखली

पत्नीने मुलाच्या अकरावी प्रवेशासाठी पैसे मागितले म्हणून तानाजी पवार यांनी थेट कपाटातून त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर काढली. त्यांनी पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच पतीच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर रोखून डोक्यात गोळ्या घालण्याची धमकी दिली. यावेळी कविता या घाबरल्या. त्यांना पतीच्या अशा वागणुकीचा प्रचंड राग आला. त्यांनी गुरुवारी (12 ऑगस्ट) संध्याकाळी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठलं. तिथे त्यांनी आपल्या पतीची फिर्याद दिली.

पत्नीचा पार्लर आणि शिवणकामचा व्यवसाय

कविता पवार या पार्लर आणि शिवणकाम करतात. त्यांचा मुलगा आदित्य याच्या अकरावीच्या प्रवेशासाठी त्यांनी पती तानाजी पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण पतीने पैसे देण्यास नकार दिला. तसेच तानाजीने स्वत:चे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटातून बाहेर काढले. पत्नीवर ते रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली. तसेच अश्‍लील शिवीगाळ केली.

पतीविरोधात गुन्हा दाखल

या प्रकारानंतर पत्नी कविता यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्री पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीविरुद्ध आर्म ॲक्ट, शिवीगाळ, दमदाटी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. तसेच त्याला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

पतीचा चारित्र्यावरुन संशय, दोघांमध्ये सारखा वाद, अखेर पत्नीने जे केलं त्याने नागपूर हादरलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.