अमेरिकेत बसून पतीने भारतातील बायकोला संपवलं, दुचाकी अपघातात मृत्यूचा बनाव

जयाभारतीचा 2015 मध्ये विष्णूप्रकाशसोबत विवाह झाला होता, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आणि तपासाची दिशा फिरली (Husband US kill wife in Tamil Nadu)

अमेरिकेत बसून पतीने भारतातील बायकोला संपवलं, दुचाकी अपघातात मृत्यूचा बनाव
तामिळनाडूतील महिलेची सुपारी देऊन हत्या
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 4:14 PM

चेन्नई : अमेरिकेत बसून पतीने तामिळनाडूतील पत्नीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 28 वर्षीय जयाभारतीची ट्रकचालकांच्या टोळीला सुपारी देण्यात आली होती. दुचाकीला ट्रकची धडक बसून तिचा अपघात मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत हत्या प्रकरणाचा उलगडा केला. (Husband working in the US hires henchmen to kill wife in Tamil Nadu)

कसा झाला अपघात?

तामिळनाडूतील तिरुवरुर मधील किदरकोंडम भागात ही घटना घडली. 21 मे रोजी जयाभारती नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने कामावरुन घरी येत होती. त्यावेळी कदवैयारु पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने तिच्या दुचाकीला धडक दिली. वाहन चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. तर जयाभारती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती.

कुटुंबीयांना घातपाताचा संशय

पादचाऱ्यांना हा अपघात झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. परंतु गंभीर जखमी झालेल्या जयाभारतीने अखेरचा श्वास घेतला. जयाच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. स्थानिकांशी बोलून, काही पुरावे गोळा करुन कुटुंबीयांनी थिरुवरुन तालुका पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 337 (इतरांच्या सुरक्षिततेस किंवा जीवाला धोका निर्माण होईल असे वर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

2015 मध्ये विष्णूप्रकाशसोबत विवाह

जयाभारतीचा 2015 मध्ये विष्णूप्रकाशसोबत विवाह झाला होता, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. गेल्या पाच वर्षांपासून विष्णू अमेरिकेतील आयटी फर्ममध्ये नोकरी करत असल्याचं त्यांना समजलं. जयाभारतीही त्याच्यासोबत यूएसमध्येच राहत होती. परंतु वैवाहिक मतभेदांमुळे तिने पतीपासून फारकत घेतली आणि ती मायदेशी परतली. कुटुंबीयांच्या प्रयत्नानंतरही दाम्पत्यात समेट घडला नाही. अखेर माहेरी परतून तिने अंतकुडी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी धरली.

पोटगीच्या भीतीने विष्णू बिथरला

जयाभारतीने घटस्फोटासाठी अर्ज करुन पतीला नोटीस पाठवली होती. त्यामुळे चिडलेल्या विष्णूप्रकाशने जयाभारती आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावलं होतं. आपल्या पोटगी द्यावी लागेल, याची विष्णूला भीती होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा वळवली. जयाभारतीचा अपघात झाला, त्या भागाचे सीसीटीव्ही फूटेज, सीडीआर आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब पोलिसांनी नोंदवला.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

घरापासून अपघात स्थळापर्यंत एक ट्रक जयाभारतीचा पाठलाग करत असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी माहिती काढली असता तो सेंठीकुमारच्या मालकीचा असल्याचं समजलं. मात्र त्याने ट्रक जगनला विकल्याचं सांगितलं. पोलिसांनी जगनसह त्याचे साथीदार प्रसन्न आणि राजा यांना उचललं. तिघांच्या जबाबात तफावत असल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा विष्णूप्रकाशने आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे ट्रकचा मूळ मालक सेंठीकुमारचाही यामागे हात असून खरेदी-विक्री हे केवळ नाटक असल्याचं चौकशीत उघडकीस आलं. पोलिसांनी मालक सेंठीकुमारसह जगन, प्रसन्न आणि राजा यांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीसोबत मित्राचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीने राहत्या घरातच मित्राचा काटा काढला

प्रेम विवाह झालेल्या दाम्पत्यात टोकाचे वाद, उशीने तोंड दाबून पत्नीची हत्या

(Husband working in the US hires henchmen to kill wife in Tamil Nadu)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.