बायकोची हत्या करुन कपाटात ठेवलं, मुलीला दिवाणाखाली टाकलं, मग स्वत:ही गळफास

पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद येथे उघडकीस आली आहे

बायकोची हत्या करुन कपाटात ठेवलं, मुलीला दिवाणाखाली टाकलं, मग स्वत:ही गळफास
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 5:01 PM

अमरावती : पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद येथे उघडकीस आली आहे. ज्या गावात साधी चोरीचीही घटना सहसा घडत नाही, त्या गावात दुहेरी हत्याकांडासह केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (husbund killed his wife and daughter put their body in cupboard then hanged himself in Amravati)

पत्नी व मुलीच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली. अनिल दिनकरराव देशमुख असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे, तर वंदना अनिल देशमुख व साक्षी अनिल देशमुख असे हत्या झालेल्या पत्नी व मुलीचे नाव आहे.

देशमुख यांच्या घरातून शुक्रवारपासून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी येवदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, एका खोलीतील कपाटामध्ये पत्नीचा, तर दिवाणाखाली मुलगी साक्षीचा कुजलेल्या अवस्थेत, तर दुसऱ्या खोलीत अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

नागरिकांनी अनिल याला नुकतेच गावात पाहिले होते. त्यामुळे त्याने आधी पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर रात्री आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतक अनिल याच्याकडे लोडींग वाहन होते, परंतु मागील वर्षभरापासून कोरोनामुळे तेदेखील बंद होते. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या

नागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार

गुगलवर Nagpur Murder ला दोन लाखाहून अधिक सर्च, गुन्हेगारीचा नागपूरच्या गुंतवणुकीवरही परिणाम

(husbund killed his wife and daughter put their body in cupboard then hanged himself in Amravati)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.