Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | कट मारुन जाण्याचा प्रयत्न जीवावर, ट्रकखाली चिरडून बाईक स्वाराचा मृत्यू

अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

CCTV | कट मारुन जाण्याचा प्रयत्न जीवावर, ट्रकखाली चिरडून बाईक स्वाराचा मृत्यू
हैदराबादेत भीषण अपघातImage Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:56 PM

हैदराबाद : अपघातात बाईकस्वाराला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात (Hyderabad Accident) दुंडीगल भागात ट्रक आणि बाईकचा अपघात (Bike Accident) झाला. डाव्या बाजूने कट मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकने बाईकला धडक दिली. त्यानंतर ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आज (सोमवार नऊ मे) रोजी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाला आहे. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

नेमकं काय घडलं

आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात दुंडीगल भागात ट्रक आणि बाईकचा अपघातात होऊन बाईकस्वाराला जीव गमवावा लागला आहे.  ट्रकच्या डाव्या बाजूने कट मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न बाईकस्वार करत होता. यावेळी ट्रकचा बाईकला धक्का लागला आणि त्यानंतर  दुचाकीस्वार तरुण ट्रकखाली चिरडून ठार झाला.

आणि बाईकस्वार ट्रकखाली चिरडला गेला…

सोमवारी सकाळी भर रस्त्यात रहदारीच्या वेळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडला गेल्याची अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बाईकस्वाराचा दोष?

दरम्यान, ट्रक चालकासाठी डावी बाजू हा ब्लाईंड स्पॉट असून बाईक स्वाराने त्या बाजूने कट मारुन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न टाळायला हवा होता, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात

दरम्यान, तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या अपघातात 8 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. एल्लारेड्डी मंडलच्या हसनपल्ली गेटजवळ सुमारे 26 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो ट्रॉलीला वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली होती.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.